आजही पुण्यात चांदीच्या कलशात सांभाळून ठेवल्या आहेत नथुराम गोडसेंच्या अस्थी!

मुंबई : आज 30 जानेवारी. भारताच्या इतिसाहात या दिवसाची नोंद काळा दिवस म्हणून केली गेलीय. कारण, याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली.त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचे नाव होते नथुराम गोडसे. त्याने आपल्या पिस्तुलातून गांधीजींच्या अंगावर एकामागून एक तीन गोळ्या झाडल्या.गांधीजींच्या हत्येने संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. दुसरीकडे गांधीजींच्या हत्येच्या गुन्ह्यात नथुराम गोडसे यांना अटक करण्यात आली. त्याच्यावर एक वर्षाहून अधिक काळ खटला चालला. यादरम्यान त्याने कोर्टात आपला गुन्हा कबूल केला आणि गांधीजींची हत्या आपणच केल्याचे सांगितले.

आपली बाजू मांडत गोडसे कोर्टात म्हणाले होते की, 'गांधीजींनी देशासाठी केलेल्या सेवेचा मी आदर करतो आणि म्हणूनच त्यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी मीही त्यांच्या सन्मानार्थ नतमस्तक झालो. पण त्यांनी अखंड भारताचे दोन तुकडे केले, तेच कारण आहे. की ज्यामूळे मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.'नथुराम यांच्याबद्दल अनेक गोष्टी उघडकीस आलेल्या नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे, त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले गेलेले नाही. तर, त्या पुण्यातील नथूराम गोडसे वास्तूसंग्रहालयात सुरक्षित जपून ठेवण्यात आल्या आहेत. पुण्यातील शिवाजी नगर भागात असलेल्या एका इमारतीच्या खोलीत चांदीच्या कलशात त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.गोडसे यांचे हे संग्रहालय त्यांच्या भावाच्या नातवाची आहे. या संग्रहालयात गोडसे यांच्या अस्थिकलशासहीत त्याचे काही कपडे आणि हस्तलिखितही ठेवण्यात आल्या आहेत.नथुराम गोडसेची भाची हिमानी सावरकर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, गोडसे यांचा मृतदेह फाशी दिल्यानंतरही कुटुंबियांना देण्यात आला नाही. उलट सरकारनेच त्यांच्यावर एका नदीच्या काठावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर त्याची अस्थी एका पेटीत आम्हाला देण्यात आल्या.गांधी हत्येच्या कटात सहभागी असलेल्या नथुराम गोडसे यांचे बंधू गोपाल गोडसे यांनी लिहीलेल्या 'गांधी-वध और मैं' या वादग्रस्त पुस्तकात दावा केला आहे की, नथुराम यांनी फाशीच्या एक दिवस आधी तुरुंगातून पत्र लिहीले होते. त्यात ते असे म्हणाले होते की, "माझ्या शरीराचा काही भाग सुरक्षित ठेवा.

जेव्हा पाकीस्तानातील सिंधू नदी स्वतंत्र भारतात पुन्हा विलीन होईल आणि अखंड भारताची निर्मिती होईल. तेव्हा माझ्या अस्थी प्रवाहित करा. यासाठी कितीही वर्ष लोटली तरी चालतील. गोडसे यांच्या शेवटच्या इच्छे प्रमाणेच त्या अस्थींचे आजही विसर्जन केले गेले नाही.महात्मा गांधींच्या चार मुलांपैकी दोन मणिलाल आणि रामदास हे गोडसे आणि आपटे यांच्या फाशीच्या विरोधात होते. खुद्द महात्मा गांधी यांचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांनी याला दुजोरा दिला आहे. महात्मा गांधींनी फाशीच्या शिक्षेला विरोध केला. ते मारेकऱ्यांच्या गोळ्यांना बळी पडले, पण गांधीजी फाशीच्या विरोधात असल्याने नथुराम गोडसेला फाशी देऊ नका, नारायण आपटेला फाशी देऊ नका, असे आवाहन त्यांच्या दोन मुलांनी तत्कालीन सरकारला केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने