केसालाही धक्का लागणार नाही ; नविद मुश्रीफ

कागल : जोपर्यंत सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा विश्‍वास आमदार हसन मुश्रीफ यांचे चिरंजिव आणि गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी आज व्यक्त केला.येथील आमदार मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकून चौकशी केली. बारा तासांच्या चौकशीनंतर मुश्रीफ यांना कार्यकर्त्यांनी खाद्यांवर घेऊन जल्लोष करत जोरदार घोषणा दिल्या. या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.नविद मुश्रीफ म्हणाले, ‘‘गेली पाच दिवस कागलमध्ये ईडीचा छापा टाकला जाणार असल्याची चर्चा होती. पण, अशा कारवाईला आपण घाबरत नाही.ईडीची जी कारवाई झाली आहे, त्यांना आम्ही शांतपणे उत्तरे दिली आहेत. त्यांना सहकार्य केले आहे. चौकशी करणे हे त्यांचे काम आहे. त्यांच्या कामात कोणताही अडथळा आणला नाही.त्यांची जी-जी माहिती हवी होती ती प्रत्येक माहिती दिली आहे. आवश्‍यक सर्व बाबींची पूर्तता केली आहे. मात्र, या छाप्यातून त्यांना काहीही साबित होणार नाही, हा विश्‍वास आहे.दरम्यान, आज सकाळपासून सर्वपक्षीय कार्यकर्ते दिवसभर थांबून होते. ते सर्व आम्हाला धीर देण्यासाठी आले, त्यांचे आम्ही आभारी आहे.’’

हे भाजपचे षड्‌यंत्र असल्याचा आरोप

दरम्यान, या कारवाईचा व भाजपचा निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली. यावेळी मुश्रीफांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. याचबरोबर प्रकाश गाडेकर यांच्या घराबाहेरही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.आमदार मुश्रीफांना बदनाम करण्यासाठी भाजपने ईडीच्या माध्यमातून रचलेले हे षड्‌यंत्र आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने