Netflix चा नवा नियम, आता जुगाड बंद; नव्या फिचरनुसार पासवर्ड शेअरींगसाठी मोजावे लागतील एवढे पैसे

मुंबई:  नेटफ्लिक्सद्वारे आता पासवर्ड शेअरींगसाठी नवा नियम लागू होतोय. तेव्हा आता मित्रमंडळी, नातेवाइकांना तुमच्या नेटफ्लिक्स अकाउंटवर फ्रीमध्येय मूव्ही आणि टीव्ही शोज बघता येणार नाही. तेव्हा आता तुमचा जुगाड लवकरच बंद होणार आहे.नेटफ्लिक्स नवे पासवर्ड शेअरींग फिचर घेऊन येत आहे. ज्यामुळे आता घराबाहेरील लोकांसह पासवर्ड शेअर घालण्यावर प्रतिबंध लागणार आहे. नेटफ्लिक्सच्या नवीन नियमांनुसार, नेटफ्लिक्स वापरकर्ते त्यांचे सदस्यत्व त्यांच्या घराबाहेर कोणाशीही शेअर करू शकणार नाहीत. Netflix म्हणते की घराबाहेरील कोणत्याही वापरकर्त्यांना तुमच्या पासवर्डवर Netflix चालवण्यासाठी पैसे द्यावे लागतील.

मोजावे लागतील एवढे पैसे

नेटफ्लिक्स काही लॅटिन अमेरिकन देशांमध्ये नवीन पासवर्ड शेअरिंग फिचरची चाचणी घेत आहे. यामध्ये कोस्टा रिका, चिली, पेरू या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये, नेटफ्लिक्स अकाउंट चालवण्यासाठी मित्र आणि घराबाहेरील लोकांना $3, दर महिन्याला सुमारे 250 रुपये मोजावे जातील. भारतातील मित्रांच्या खात्यावर नेटफ्लिक्स चालविण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील? सध्या याबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.एकाच अकाउंटचा पासवर्ड दुसरे वापरताय हे कसे कळेल ?

पण प्रश्न असा पडतो की घराबाहेर तुमच्या नेटफ्लिक्स अकाउंटवर कोण आहे हे कसे ओळखणार? यासाठी नेटफ्लिक्स आयपी अॅड्रेस, डिव्हाईस आयडी आणि अकाउंट अ‍ॅक्टिव्हिटीद्वारे पासवर्ड शेअरिंगचा नवीन नियम लागू करेल.म्हणजे नेटफ्लिक्स कोणत्या डिव्हाईसवर आयडी, इंटरनेट आयपी अॅड्रेस आणि लोकेशन नेटफ्लिक्स लॉग इन करत आहे ते तपासेल. अशा प्रकारे नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म हे ट्रॅक करेल की तुम्ही इतर कोणाचे नेटफ्लिक्स खाते वापरत आहात की नाही?

मात्र नेटफ्लिक्सला बसणार फटका

नेटफ्लिक्सच्या मते, 2o22 मध्ये मागल्या दहा वर्षात पहिल्यांदा यूजर्सची संख्येत घट झाल्याचे दिसून आले. कंपनीला यामुळे मोठे नुकसानही झाले आहे.Netflix ने भारतात सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन 149 रुपयांत लाँच केला आहे. सध्या, चार Netflix प्लान्स उपलब्ध आहेत. यामध्ये फक्त मोबाइल प्लॅन 149 रुपयांचा आहे, तर बेसिक प्लॅन 199 रुपयांचा आहे. तर स्टँडर्ड प्लॅन 499 रुपये आणि प्रीमियम प्लॅन 649 रुपयांचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने