तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर ‘अलीबाबा’ मालिकेत नवा ट्विस्ट; शिझान खानच्या जागी ‘या’ अभिनेत्याची एंट्री, प्रोमो पाहिलात का?

मुंबई : सब टीव्हीवरील मालिका ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मधील मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. तिने मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असताना गळफास घेतला होता. त्यानंतर शोचा मुख्य अभिनेता आणि तुनिषाचा एक्स बॉयफ्रेंड शिझान खानला पोलिसांनी तिच्या आत्महत्येप्रकरणी अटक केली होती. तुनिषाच्या मृत्यूनंतर मालिकेचं शूटिंग थांबलं होतं. तसेच मालिकेतील दोन्ही कलाकार नसल्याने आता निर्माते मालिका कसे सुरू ठेवतील, याबद्दल प्रेक्षकांना प्रश्न पडला होता. पण आता निर्मात्यांनी ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’चा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे.आता नव्या प्रोमोमध्ये शिझान खानच्या जागी अभिनेता अभिषेक निगमची एंट्री पाहायला मिळत आहे. शोचा प्रोमो सब टीव्हीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. “काही तरी मोठं घडणार आहे. पाहत राहा”, असं कॅप्शन त्याला देण्यात आलंय. ‘तो परत येतोय’, असं त्या व्हिडीओत लिहिलेलं दिसतंय. तसेच निर्मात्यांनी अभिषेक निगमच्या एंट्रीला ‘अली बाबा: एक अनदेखा अंदाज चॅप्टर २’ असं नाव दिलंय. त्यामुळे तुनिषा आणि शिझानची भूमिका असलेलं पहिलं चॅप्टर संपवून अभिषेकच्या भूमिकेसह आता दुसरा चॅप्टर सुरू केला जाणार आहे.प्रोमोमध्ये अभिषेक निगम पाठमोरा दिसतोय. त्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. पण निर्मात्यांनी त्याच्या नावाची पुष्टी केली आहे. दरम्यान, हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता टीव्हीवर प्रसारित होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने