रीलस्टार रियाज अलीसोबत शूटसाठी अमृता फडणवीसांकडून सरकारी बंगल्याचा वापर?

मुंबई: सध्या महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा त्यांची बायको अमृता फडणवीस यांचीच चर्चा जास्त आहे. आणि त्याचं कारण ठरलंय एक रील.. अमृता फडणवीस यांचं नुकतच प्रदर्शित झालेला ''मूड बना लिया'' हे गाणं गाजत असतानाच त्यांची एक रील व्हायरल झाली आणि नव्या वादाला तोंड फुटले.. कारण हा व्हिडिओ नेमका कुठे शूट झाला यावरून गदारोळ झाला आहे.अमृता फडणवीस यांच्या 'मूड बनालीया' हे गाणे सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच आले आणि अल्पवधीतच या गाण्याने मिलियन व्हूवर्सचा टप्पा ओलांडला. या गाण्याची सोशल मीडियावरही बरीच चर्चा आहे. अनेकांनी या गाण्यावर रील शूट केले आहेत. आता स्वतः अमृता त्यांच्या नवीन गाण्यावर थीरकल्या आहेत.


अमृता यांनी रील स्टार रियाझ अली बरोबर एक व्हिडीओ बनवला आहे. रियाझ अलीसह अमृता या व्हिडीओमध्ये त्या गाण्याची हूक स्टेपवर करत डान्स करताना दिसत आहेत. रियाजने हा विडिओ त्याच्या अकाऊंट वरुन शेयर केला आणि बघता बघता तो प्रचंड व्हायरल झाला आणि एक महत्वाचा मुद्दा उपस्थित झाला, तो म्हणजे हा विडिओ शूट केला कुठे?या व्हिडिओ मध्ये एक आलीशान बंगला दिसतो आहे. ज्यामध्ये ते नाचले आहेत. हा बंगला उप मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान असल्याचा अंदाज काहींनी लावला आणि त्यावरून अनेकांनी अमृता त्यांच्यावर टीका केली.या बंगल्याचा लुक पहाता हा बंगला एखाद्या बड्या नेत्याचा किंवा सरकारी बंगला असावा असे वाटते आहे, पण त्याबाबत अजून कोणतेही सत्य समोर आलेले नाही. 

अनेकांनी हा देवेंद्र फडणवीस यांचा खासगी सागर बंगला आहे का अशीही शक्यता वर्तवली आहे.तर काहींच्या मते हे एखादे हॉटेल असावे जिथे हा व्हिडिओ शूट केला गेला. हा व्हिडिओ कुठे शूट झाला याबाबत अजून रियाज आणि अमृता यांच्यापैकी कुणीही स्पष्टता दिली नसली तरी राजकीय पक्षांकडून मात्र हा बंगला सरकारी असल्याचा रेटा लावला जात आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी तर या रीलवर आक्षेप घेतला आहे. एका माध्यमात त्या म्हणाले, '' अमृता यांनी केलेला हा रील व्हिडीओ सरकारी बंगल्यात शूट करण्यात आला आहे. अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात रील बनवण्यासाठी सरकारकडून लेखी अधिकृत परवानगी घेतली होती का? हे देखील त्यांनी रीलप्रमाणे व्हायरल करावं.'' असं त्या म्हणाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने