'तूझ्यासोबत नाही बोलायचं', शिवचं निमृतसोबत खटकलं...

मुंबई: ' बिग बॉस 16' मध्ये आज एलिमिनेशन होणार आहे. या आठवड्यात टीना दत्ता, शालीन भानोत, सौंदर्या शर्मा आणि सुंबुल तौकीर खान नामांकित आहेत. मात्र या सगळयात शिव आणि निमृतचं जोरदार भांडण झालं आहे.शोमध्ये निमृत आणि शिव यांची खूप घट्ट मैत्री आहे. त्याच्यात कधीच वाद झालेला दिसला नाही. नेहमीच दोघांनी सहमतीने निर्णय घेतले. शिव आणि निमृतची मैत्री कालांतराने घट्ट होत गेली. मात्र जेव्हा निमृतच्या वडिलांनी तिला आणि शिवला वेगळं खेळण्याचा सल्ला दिला तेव्हा या मैत्रीत तडा गेला.

दरम्यान बिग बॉसच्या निर्मात्यांनी एक प्रोमो जारी केला आहे, ज्यामध्ये  बिग बॉस घरातील सदस्यांना नामांकित सदस्यांपैकी एकाचं नाव देण्यास सांगतात .प्रियंका चहर चौधरी, शिव आणि इतरांनी सौंदर्याचे नाव एलिमिनेशनसाठी घेतले. पण अर्चना म्हणते की सौंदर्या शर्मा सर्व कामे चांगल्या प्रकारे करते आणि प्रत्येक गोष्टीत भाग घेते आणि ती शालीनचं नावं सांगते. पण या सगळ्या चर्चेत निम्रित कौर अहलुवालियाला वाटतं की शिव असभ्य वागतोय. ती शिवला यावरुनच प्रश्न करते आणि त्यांच्यात भांडण होतं.निमृत शिवला म्हणते, 'तू इतका हायपर का होतोय? मी इथं भांडण करायला आलेली नाही. यावर शिव म्हणतो की तो तिच्याशी बोलत नाही मग ती मध्येच का बोलत आहे. शिव म्हणतो, ' इथे खेळ खेळायला आली आहेस इथं? की भांडण करायला?यांनतर दोघांमध्ये वाद होतो आणि यावर शिवने आपला संयम तुटतो आणि तो त्याच्य जॅकेट फेकतो आणि म्हणातो, 'मी काहीही बोललो तरी प्रॉब्लम.' आता शिव आणि निमृतची मैत्री टिकते की फिनालेसोबतच ती तुटते हे पाहावे लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने