तुमचा दाभोळकर करू...श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी!

नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. तुमचा दाभोळकर करू, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली. त्यामुळे श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धिरेंद्र महाराजांच्या भक्तांकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आगे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते व श्याम मानव यांच्या मुलाच्या मोबाईलवर हे धमकीचे मॅसेज करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकर्चे हरीश देशमुख यांनी दिली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. समितीने याबाबत रीतसर तक्रार नागपूर पोलिसात दाखल केली आहे. आज अकरा वाजेपर्यंत तुमची हत्या करु, तुमचा दाभोळकर करु, अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली. यापूर्वी देखील श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला आहे होता. सभा संपताच काही कार्यकर्त्यांनी उभे राहत त्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली होती.श्याम मानव हे फक्त हिंदु धर्माच्या विरोधात बोलून हिंदू धर्माला बदनाम करतात. आजच्या सभेत त्यांनी धिरेंद्र कृष्ण महराज यांची पोलखोल केली नाही. फक्त हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सभेचा वापर केला, असा आरोप तरुणांकडून करण्यात आला होता. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज श्याम मानव यांना धमकी आल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. 

काय घडलं होतं?

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी नागपूरमध्ये आलेल्या धीरेंद्र महाराज यांना आव्हान दिलं होतं. धीरेंद्र महाराज यांनी दिव्यशक्ती सिद्ध करुन दाखवल्यास त्यांना ३० लाखांचं बक्षीस देऊ, असं ते म्हणाले होते. तसेच महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार धीरेंद्र महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर श्याम मानव यांची सभा सुरू होती, धीरेंद्र कृष्ण महाराज यांची पोलखोल करण्यासाठी ही सभा घेण्यात आल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने