शिंदेंना हुलकावनी देणाऱ्या आमदाराची जीभ घसरली, म्हणाले "बायकोच्या जीवावर..."

मुंबई:  गुवाहाटीवरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा ताफा तोडत मुंबईत पळून आलेले आमदार नितीन देशमुख आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. रवी राणा यांच्यावर टीका करताना नितीन देशमुख यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे. बायकोच्या जीवावर आम्ही राजकारण करत नाही, असा टोला देशमुख यांनी रवी राणा यांना लगावला आहे.नितीन देशमुख यांनी रवी राणा यांच्यावर बोलताना अपशब्दांचा वापर केला आहे. नितीन देशमुख बायकोच्या भरवश्यावर राजकारण करणारा माणूस नाही. जनतेच्या आणि स्वत:च्या कामाच्या भरवश्यावर आम्ही राजकारण करतो. हा ****** काय आम्हाला सांगोतो की नितीन देशमुखांचा पापाचा घडा भरला, असे देशमुख म्हणाले."हा ****** मराठी माणसाच्या भरवश्यावर उभा झाला. हा महाराष्ट्रातील आहे का नाही हे सुद्धा लोकांना माहित नाही. तरी मराठी माणसाने यांना मोठ केलं. येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणसे त्याला त्याची जागा दाखवतील", असे नितीन देशमुख म्हणाले. यावर आमदार रवी राणा यांनी देखील पलटवार केला आहे. नितीन देशमुख कोण आहे हे मला अधिवेशनात माहित झाले होते. नागपूर पोलिसांना मारहाण प्रकरणात ३५३ त्यांच्यावर दाखल झाली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ज्यांनी ज्यांनी चुकीचे कामे केले. ज्यांनी पाप केलं आहे. त्या पापाचा घडा भरला आहे.हे कायद्याचे राज्य आहे. नियमाने चालणारे सरकार आहे. कोणी कायदे हातात घेतले तर त्याला कायदेशीर उत्तर देण्याचे काम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये होणार आहे, असे रवी राणा म्हणाले.रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांचे साम्राज्य उध्वस्त झाले. ज्यांनी हनुमानाचा आणि रामाचा विरोध केला. त्यांच्या लंकेचा नाश झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी जे पाप केलं होतं त्यांना ते याच काळात भोगाव लागलं. अहंकाराचा विषय संपला आहे. हा जो फडफड करणारा नितीन देशमुख आहे. जो खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांना धोका देऊन परत आला तो काही दिवसांनी शिंदे गटात दिसेल, असा दावा रवी राणा यांनी केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने