RRR,काश्मिर फाईल्स, छेल्लो शो..नामांकन यादीतून कोणाचा पत्ता कट.. एका क्लिक्वर वाचा संपूर्ण लिस्ट

मुंबई: जगातील सर्वात प्रतिष्ठित अकादमी पुरस्काराची (ऑस्कर पुरस्कारश) प्रत्येक सिनेप्रेमी वाट पाहत असतो. 12 मार्च 2023 रोजी ऑस्कर विजेत्या चित्रपटांची घोषणा होणार आहे.ऑस्कर-2023 ची शॉर्टलिस्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. आता ऑस्कर-2023 ची नामांकन यादी जाहीर केली जाणार आहे.आज ऑस्कर नॉमिनेशन लिस्टची घोषणा कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स थिएटरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली जाणार आहे. ऑस्कर विजेते अभिनेता-निर्माते रिझ अहमद आणि अॅलिसन विल्यम्स हे हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत.तुम्ही ऑस्कर नामांकन कधी आणि कुठे पाहू शकता?95 वा अकादमी पुरस्कार 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस येथील डॉब्ली थिएटरमध्ये आयोजित केला जाईल. त्याचबरोबर या सोहळ्याचे सूत्रसंचालन 'लेट नाईट टॉक शो'चे प्रस्तुतकर्ता जिमी किमेल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा कार्यक्रम मंगळवारी सकाळी 5:30 AM PST/8:30 AM EST वर प्रसारित केला जाईल. वेळ भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता असेल. ऑस्कर नामांकनांसाठीचे सादरीकरण oscars.com, oscars.org किंवा YouTube यासह अकादमीच्या सोशल मीडिया चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जाईल.

ऑस्कर- 2023 साठी भारताकडून 'आरआरआर' आणि 'छेल्लो शो' हे चित्रपट भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आले आहे.आरआरआरहा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड चित्रपटाच्या यादीत सामील झाला आहे. 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील वीएफएक्स, चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटातील कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. याशिवाय द काश्मीर फाईल्स आणि कांतारा हे सिनेमे सुद्धा ऑस्कर च्या शर्यतीत होते. पण या सिनेमांना अजून तरी नॉमिनेशन मिळालं नाहीये.या चित्रपटामधील नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. तर ऑस्करच्या शॉर्टलिस्टेड चित्रपटाच्या यादीत छेल्लो शो चित्रपटाचा देखील समावेश झाला. दिग्दर्शक पान नलिन यांनी छेल्लो शो चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नामांकन यादीमध्ये या चित्रपटांचा समावेश होईल का? या प्रश्नांचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने