ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत ज्युनियर एनटीआर?चाहत्यांच ट्विटरवर झिंगाट

मुंबई: दक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर याचा लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये सामावेश आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या ही केवळ दाक्षिणेतच नाही तर सगळ्या भारतात आहे. ज्युनियर एनटीआरने अनेक सुपरहिट चित्रपट दिली आहेत मात्र त्याच्या 'आरआरआर' चित्रपटाने सर्वांची मने जिंकली आहेत.ऑस्कर 2023 साठी 'आरआरआर' चित्रपटानंतर ज्युनियर एनटीआरचे नाव चर्चेचा विषय बनले आहे. 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ज्युनियर एनटीआरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळू शकणार असल्याची बातमी समोर आहे.यूएसए टुडे या इंग्रजी वेबसाइटच्या बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत ज्युनियर एनटीआरचंही नाव निवडलं जाऊ शकते. सध्या या शर्यतीत ज्युनियर एनटीआरचे नावही सामील झालं आहे. 'RRR' चित्रपटात भारताचे स्वातंत्र्यसैनिक कोमाराम भीम यांची भूमिका साकारण्यासाठी ज्युनियर एनटीआर याच्या नावाचा सामावेश होऊ शकतो.यापूर्वीही एका वेबसाइटने 'आरआरआर' चित्रपटासाठी ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या नामांकनासाठी स्पर्धक म्हणून ज्युनियर एनटीआरच्या भूमिकेचाही उल्लेख केला आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत पुष्टी ऑस्कर पुरस्कार समितीच्या अंतिम घोषणेनंतरच होणार आहे. पण ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी हा खरोखर आनंदाचा क्षण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने