आज्जी भडकली, मुश्रीफांवर ED ची छापेमारी होताच म्हणाली...

कोल्हापूर: माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, एक आज्जी चांगलीच चर्चेत आली आहे.मुश्रीफ सध्या मुंबईत आहेत. दरम्यान, त्यांच्या घरावर ईडीची छापेमारी होताच समर्थकांनी त्यांच्या घरासमोर तोबा गर्दी केली. कागलच्या चौकाचौकात समर्थकांनी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, एका आज्जीने वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. माध्यमांशी बोलताना आजी चांगलीच संतापली असल्याचे पाहायाला मिळाले.काय म्हणाली आजी?

भाजपला पाडायचंय आणि मुश्रीफला निवडून आणायचंय. मी पेन्शन नेण्यासाठी आलो आहे. कागल मतदारसंघात मुश्रीफ आणि जनतेचे नाते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी अनेक निराधारांना शासकीय लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मुश्रीफांवर संकटे आली त्यावेळी त्यांचे पाठीराखे नेहमीच धावून आले आहेत.हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. 'आज सकाळपासून माझ्या घरावर, माझ्या मुलीच्या घरावर तसेच नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. मी कामानिमित्त बाहेर असल्याने मला दूरध्वनीवरून कारवाईची माहिती समजली.कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी, अशी मी विनंती करत आहे. कागल बंदची हाक देऊ नये, त्यांना तपासात सहकार्य करावे, अशी मी विनंती करत आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य माझ्या कार्यकर्त्यांनी करू नये. ' असे मुश्रीफांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने