ऑनलाईन सातबारा सेवा बंद! शेतकऱ्यांचे होतायेत हाल

मुंबई: शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारे आणि आठ-अ उतारा ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सहजरित्या उपलब्ध होत होते पण आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्यापासून सातबाराची डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालात सुरू असल्याच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं वृत्त अॅग्रोवनने दिलं आहे.दरम्यान, विविध शासकीय आणि इतर शेतीच्या विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना सातबारा आणि आठ - अ उताराची गरज असते. तर शेतकऱ्यांचे काम सोपे व्हावे यासाठी शासनाने डिजिटल सातबारे मिळवण्यासाठी संकेतस्थळावर सेवा सुरू केली होती. पण ही सेवा सध्या बंद करण्यात आली आहे.ऑनलाईन उतारे बंद तर झालेच आहेत पण तलाठी कार्यालयेसुद्धा मागच्या काही दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी शेतकरी करू लागले आहेत. तर तलाठ्याकडून स्वाक्षरीचा सातबारा काढण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.दरम्यान, शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या डिजिटल स्वाक्षरीची सेवा कोणत्यातरी तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली असावी, यासंदर्भात अधिक माहिती घेऊन ती पूर्ववत करण्यात येईल अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने