आता शाळेत 'सर', 'मॅडम' नव्हे तर 'टिचर' म्हणायचं; बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश

केरळ: केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने (केएससीसीपीसीआर) राज्यातील सर्व शाळांना निर्देश दिलेत की, शाळेतील शिक्षकांना त्यांच्या लिंगाची पर्वा न करता 'सर' किंवा 'मॅडम' ऐवजी 'टीचर' म्हणून  संबोधावे.     केएससीसीपीसीआरच्या आदेशात "सर" आणि "मॅडम" सारख्या शब्दांनी हाक मारणे टाळणे असं नमूद केले आहे. पॅनेलचे अध्यक्ष के. व्ही. मनोजकुमार आणि सदस्य सी. विजयकुमार यांच्या पॅनलने बुधवारी सामान्य शिक्षण विभागाला राज्यातील सर्व शाळांमध्ये टिचर हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले.



सर किंवा मॅडम याऐवजी 'टिचर' म्हटल्यास सर्व शाळांमधील मुलांमध्ये समानतेची भावना रुजवण्यास मदत होते आणि शिक्षकांविषयीची त्यांची ओढही वाढू शकते, असेही बालहक्क आयोगाने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार 'सर' आणि 'मॅडम' म्हणणे बंद करून भेदभाव संपवण्याची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीच्या याचिकेवर विचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं समजतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने