आता फक्त ऑस्करची प्रतिक्षा! 'काश्मीर फाईल्स' शॉर्टलिस्ट, दिग्दर्शक अग्निहोत्रींची कडक पोस्ट

मुंबई: भारतामध्ये आतापर्यतचा सर्वाधिक वादात सापडलेला आणि ज्यावरुन मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर चर्चा केली असा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिग्दर्शकानं ट्विट करुन ही माहिती दिली आहे.अग्निहोत्री यांच्या काश्मिर फाईल्सला ऑस्करच्या यादीत स्थान मिळाले आहे. भारताकडून जे पाच चित्रपटांची निवड झाली आहे त्यामध्ये काश्मीर फाईल्सचा देखील समावेश आहे. अग्निहोत्रींनी सोशल मीडियावरील लिहिलेली पोस्ट आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.अग्निहोत्री यांनी आता फक्त ऑस्करची प्रतिक्षा असे म्हणत मोठा प्रवास बाकी आहे असे म्हटले आहे. पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, अनुपम खेर हे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी निवडले गेले आहेत. काश्मिर फाईल्स हा ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं भारतातून दोनशे कोटींहून अधिक कमाई केली होती. गेल्या वर्षी गोव्यामध्ये जो इफ्फी चित्रपट महोत्सव पार पडला त्यामध्ये काश्मिर फाईल्सवरुन मोठा वाद निर्माण झाला होता.यंदा भारताकडून मोठमोठे चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये एस एस राजामौली यांचा आरआरआर, रिषभ शेट्टीचा कांतारा, या चित्रपटांचा समावेश आहे. आता त्यात अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सचेही नाव घेतले जात आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे.

यापूर्वी कांतारा देखील ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला असून त्याला ऑस्कर्सच्या बेस्ट पिक्चर्स आणि बेस्ट अॅक्टरच्या कॅटगिरीसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. त्यामुळे शेट्टीच्या या चित्रपटाला ऑस्कर मिळणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा संघर्ष पाहायला मिळत असताना ऑस्करची ही शर्यत कोण जिंकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.कांतारानं अॅकडमीच्या यादीत स्थान मिळवल्यानं चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. भलेही ऑस्करमध्ये कांताराची उशिरा एंट्री झाली असली तरी त्याच्या समावेशानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे अग्निहोत्री यांच्या काश्मीर फाईल्सची देखील चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने