'पवित्र रिश्ता' पुन्हा आले जुळून, मकरसंक्रांती निमित्त झाल्या गाठीभेटी

मुंबई: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'पवित्र रिश्ता' मधील मानव आणि अर्चना या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मानवची तर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अर्चनाची भूमिका साकारली होती.'पवित्र रिश्ता' या मालिकेला 1३ वर्ष पूर्ण झाली. काल झालेल्या मकरसंक्रांती निमिताने पवित्र रिश्ता मालिकेतील कलाकारांचं रियुनियन झालं.अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन या नवरा बायकोने 'पवित्र रिश्ता' मालिकेतील कलाकारांना मकरसंक्रांती निमित्ताने घरी बोलावलं होतं. यावेळी प्रिया मराठे, सविता प्रभुणे, सुवती आनंद असे कलाकार सहभागी होते. प्रियाने प्रार्थना बेहेरे आणि मालिकेतील इतर कलाकारांची आठवण काढली. या कलाकारांनी एकत्र येऊन मकरसंक्रांती उत्साहात आणि आनंदात साजरी केली.पवित्र रिश्ता मधील अर्चना म्हणजेच अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम तिच्या घरी तिच्या मैत्रिणींना कायम बोलवत असते. यात अनेक मराठी कलाकारांचा समावेश आहे. मकरसंक्रांती निमित्ताने अंकिता लोखंडेने तिच्या घरी खास पतंगांची सजावट केलेली. अंकिताने खास पूजा करून मैत्रिणींसोबत उत्साहात मकरसंक्रांत साजरी केली. अंकिताचा नवरा विकीने सर्वांचा चांगला पाहुणचार केलेला दिसतोय.2009 मध्ये टेलिकास्ट झालेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेमधील अर्चना आणि मानव ही जोडी प्रचंड लोकप्रिय ठरली. या मालिकेचे 1424 एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. २०२१ ला या मालिकेचा सिक्वेल म्हणजेच पवित्र रिश्ता २ OTT वर रिलीज झाला. या सिक्वेल मालिकेतले बरेचसे कलाकार पुन्हा सहभागी होते. यात उषा नाडकर्णी यांचाही सहभाग होता. सिक्वेल मध्ये मानवची म्हणजेच सुशांत सिंग राजपुतची भूमिका शाहिर शेखने केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने