"मविआने मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट दिलं होतं"

मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येतात. अशातच सत्ताधारी भाजपकडून विरोधक नेत्यांवर ईडीची चौकशी लावत असल्याचे आरोप सातत्याने होत असतात. त्याच सत्ताधारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे मुंबई सीपी संजय पांडे यांना दिलं होतं म्हणतं मोठा गौप्यस्फोट केला आहे.एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमामध्ये ते बोलत होते तेव्हा ते म्हणाले कि, ठाकरे सरकारच्या काळामध्ये मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं मी कोणताही काम केलं नव्हत, किंवा कोणती चूक केली नव्हती. त्यामुळे ते मला जेलमध्ये टाकू शकतील. त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.



काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मातोश्रीचे दरवाजे त्यांनी माझ्यासाठी बंद केले. मी नाही. मी त्यांना बऱ्याचदा फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही. या अडीच वर्षात या सरकारने माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच टार्गेट त्यांनी त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलं होतं. माझं कोणाशी वैर नाही. मी कोणाशीच राजकीय वैर धरत नाही. आजही त्यांच्याशी वैर नाही. पाच वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम करतो. सरकार चालवतो. त्यांनी फोन नाही उचलला. त्यांनी दार बंद केली. हे त्यांनी केलं की इतर कोणी केलं माहीत नाही.शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार बजेटच्याच आधी होणार असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसेच, राज्यपालांच्या पदमुक्तीसंदर्भात बोलताना ते माझ्याशी खासगीत बोलताना अनेकदा मला पदमुक्त करा असे म्हणाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने