संजय राऊत हुशार आहेत पण...; भाजप नेत्याकडून राऊतांना जोरदार चिमटा

मुंबई:  उद्धव ठाकरेंकडे आता फार कमी आमदार आणि खासदार राहिले आहेत. त्यामुळे उरलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळून ठेवण्यासाठी त्यांना सरकार पडण्याची वक्तव्य करावी लागत आहेत असे विधान भाजप नेत्याने केले आहे.यावेळी त्यांनी संजय राऊतांना चिमटे काढत काही सल्लेदेखील दिले आहेत. संजय राऊत जगातील सर्वात विद्नाव व्यक्ती आहेत, असे विधान भाजपच्या नेत्याने केले आहे.राऊत हुशार आहेत, पण त्यांनी सकाळी सकाळी माध्यमांसमोर येऊन बोलण्यापेक्षा राज्याच्या हितासाठी चार गोष्टी कराव्यात, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.राऊतांनी सकाळी सकाळी माध्यमांसमोर येत टोमणे बंद करावेत असेदेखील बावनकुळे म्हणाले. टोमणे मारण्याऐवजी राऊतांनी विरोधी पक्ष म्हणून जी जबाबदारी मिळाली आहे. ती जबाबदारी काय आहे, ती योग्यरित्या पार पाडावी.

विकासाच्या दृष्टीने या पक्षाकडून चार गोष्टी अपेक्षित त्यावर लक्ष केंद्रीत करावेत. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस अशा सूचना करायचे असे यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.महाराष्ट्राची जनता टोमणे सभा, टोमण्यांना कंटाळली आहे. यापेक्षा राज्याच्या जनतेला काय वाटतं हा प्लॅटफॉर्म तयार करावा, असे बावनकुळे म्हणाले आहेत. बावनकुळे यांच्या या विधानानंतर राऊत नेमकं काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने