'बाप बापच असतो', ठाकरे गटाने झळकवलेले पोस्टर चर्चेत

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादनही केलं जात आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून सर्व पक्षांनी त्यांचे पोस्टर आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.अशातच आज औरंगाबादमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरे गटकडून पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. बाळासाहेब हयात असताना मोदी मातोश्रीवर आले होते.
 त्यावेळी त्यांनी मान झुकवून बाळासाहेबांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तोच फोटो या बॅनर्सवर लावण्यात आले आहेत.दरम्यान या पोस्टरवर ठाकरे गटकडून बाप बापच असतो' असं लिहण्यात आलं आहे. त्यामुळं सध्या हे पोस्टर चर्चेत आले आहेत. औरंगाबादमध्ये ठीकठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत. भाजपला डिवचण्यासाठीच हे बॅनर्स लावण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या दरम्यानही हे पोस्टर लावण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने