प्राजक्ताला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार; अवॉर्ड घेताच म्हणाली...

मुंबईः सध्या महाराष्ट्राची क्रश कोण? असं विचारलं तर बिनदिक्तपणे एकच नाव समोर येतं. ते म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळीची सध्या चलती आहे. आज तिने एका मानाच्या पुरस्कारावर नाव कोरलं.प्राजक्ता माळीला पांडू या चित्रपटातील खलनायिकेच्या भूमिकेसाठी झी टॉकिजचा सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला आहे. ''कष्टाचं चीज व्हायला सुरूवात झाली असं म्हणायला हरकत नाही…महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?भरभरून votes दिल्याबद्दल सबंध महाराष्ट्राचे मनापासून आभार असचं अविरत प्रेम आणि अखंड पाठिंबा आणि आशिर्वाद असू देत, हीच विनंती.मला खलनायिका म्हणून काम करायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, त्यात हा पुरस्कार मिळाला.. त्यामुळे विशेष आनंद…प्राजक्ता माळीला आज झी टॉकिजच्या वतीने सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला. तिने पांडू सिनेमामध्ये खलनायिकेची भूमिका निभावली होती.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रानबाजार वेब सीरिजमध्ये प्राजक्ताने चक्क वेश्येची भूमिका केली होती. त्यामुळे तिने तिच्याच अभिनयाची रेषा मोडीत काढून एक वेगळा अंदाज दाखवून दिला होता.'पांडू'मध्ये प्राजक्ताने पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका केली होती. नकारात्मक भूमिकेतूनही प्राजक्ताने अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आज तिला त्याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने