पवारांविषयीच्या 'त्या' विधानावर आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले मी, उद्धव ठाकरेंनी...

मुंबई : शरद पवार आजही भाजप बरोबरच आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही. त्यांनी जपून बोलावं असा सल्ला दिला. दरम्यान, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत संजय राऊतांना टोमणा मारला आहेकाही दिवसांपूर्वीच राज्याच्या राजकारणात नवीन युतीची सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.ण, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचे वैर सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचितचा निभाव लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार भाजपचेच असल्याचं मत व्यक्त केलं.यासंदर्भात आता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले.काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

माझं पवारांबाबतील वक्तव्य भुतकाळातील अनुभवावरुन आहे. असं एका वाक्यात आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.कॉंग्रसे राष्ट्रवादीला सोबत आणण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरु आहेत. आमची युती शिवसेनेसोबत आहे. वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत युती करणार नाही. उद्धव ठाकरे आम्हाला मविआमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.असे सांगत आंबेडकर म्हणाले, जेव्हा जिंकत नाही तेव्हा भाजप भांडण लावतं. भाजप भांडण लावायला कोणत्याही थराला जाईल. कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचा दुश्मन नाही. असे टोकाचे मतभेद आम्ही अनेकवेळा मांडले आहेत. भाजपचे आणि आमचे टोकाचे मतभेद आहेत. वैयक्तिक वाद नाही. असही आंबेडकर यावेळी म्हणाले.

राऊतांना दिले उत्तर

सांभाळून बोला हा सल्ला ठाकरेंनी दिला असता तर पाळला असता. असे म्हणत आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोमणा मारला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने