एकीकडे ठाकरेंसोबत युती तर... CM शिंदे-आंबेडकर यांच्यात बंद दाराआड चर्चा

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीच्या चर्चा झाल्या. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याबाबत ते उत्सुक आहेत.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आम्ही सर्वजण मिळून आगामी निवडणुका लढू असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये येण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.दरम्यान काल रात्री वंचित बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर याच्यामद्धे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड अडीच तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे.एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीसाठी चर्चा करत असतानाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे अशातच मुख्यमंत्र्यांसोबतची ही बंददाराआड झालेल्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.प्रकाश आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड अडीच तास झालेली चर्चा कशाबद्दल झाली आहे.



तर आगामी निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत दिसणार की नाहीत याची उत्तरे या बैठकीत लपलेली असू शकतात. तब्बल अडीच तास झालेल्या या बैठकीमुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.तर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या बैठकींचे सत्र सुरू झाल्यामुळे पुन्हा हे नेमके कोणते संकेत आहेत हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्याचं संगत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेटी वाढल्या आहेत. यामुळे इकडे देखील चर्चा सुरू झाल्याचं बोललं जात आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार हे गुलदस्त्यात आहे.शिंदे यांच्याकडूनही प्रकाश आंबेडकर यांनाही ऑफर देण्यात आली होती. काही अटीशर्ती यांच्याबद्दल ही बैठक झाली आहे का? एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांना आपल्याकडे वळवून घेणार का? या सर्व प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत या दोघांमध्ये काय चर्चा झाली आहे तर अद्याप कळू शकलेलं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने