कोणाच्या हातात दिसणार विनिंग ट्रॉफी?,घरात आलेल्या ज्योतिषानं दिली हिंट..

मुंबई: बिग बॉस 16 चा शेवटचा टप्पा जवळ आला आहे .. अंतिम फेरीही फेब्रुवारीमध्ये होणार आहे. शो मध्ये आता रोज का‌हीतरी नवीन बघायला मिळतं आहे आणि रोज काही तरी नवीन घडत आहे... दिवसेंदिवस खेळ पण कठीण होताना दिसत आहे.बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक नंतर नेहमी प्रमाणे ज्योतिषाची एंट्री होणार आहे. पण या ज्योतिषीला घेऊन युजर्सने प्रचंड ट्रोल केले आहे.बिग बॉसच्या घरात इतर सिझन प्रमाणे यावेळी देखील ज्योतिषी येणार आहे.या वेळी ज्योतिषी सौरिश शर्मा येणार आहे.आणि घरातील सदस्यांच्या आयुष्यात येणारा काळ आणि त्यांच्या करिअर मधील बदल याविषयी ज्योतिषी भविष्यवाणी करताना दिसणार आहे.बरं हे सगळं सांगताना ज्योतिषी सौरीश शर्मा सदस्यांना काही उपायही सांगणार आहेत. बिग बॉसचा नवीन प्रोमो सध्या भलता चर्चेत आहे. यामध्ये " घरवालोको पता चलेगा उनके सितारों का राज". अशी घोषणा होतानाच ज्योतिषी सौरिश शर्माची एंट्री दाखवली आहे. घरातील सदस्य गार्डन एरिया मध्ये बसले आहेत.ज्योतिषी निम्रितला बोलताना दिसत आहे की,'' तुझ्या लोकांनी तुझं खुप नुकसान केले आहे'', तर शिवला बोलतो,''लग्नानंतर तुझ्या जीवनात चांगले दिवस येणार आहेत'', तर प्रियंकाला बोलतो, ''तुझं आणि अंकितचं काही भविष्य नाही आहे'' , तर अर्चनाला थेट काळ्या जिभेची बोलून जातो.

यावेळी सुंबुल तौकीर विषयी बोलताना ज्योतिषी सौरिश शर्मा म्हणताना दिसत आहे की, ''सुम्बुल तुझ्या आईशी तुझं बिनसलं आहे. तेव्हा तिच्यासोबतचं नातं घट्ट कर ,जे काही रुसवे-फुगवे असतील ते मिटवून टाक,तुझं भविष्य खूप उज्वल आहे. आईचा आशीर्वाद यात खूप मदत करेल. आणि तेव्हाच पटकनं बोलून जातात,तू बिग बॉसची ट्रॉफी जिंकू शकलीस तर ही गोष्ट हैराण करणारी नसेल...'', आणि हे ऐकून शिव ठाकरे पासून इतर सगळेच घरातील सदस्य हैराण होऊन ज्योतिषाकडे पाहू लागतात.ज्योतिषी सौरिश शर्माची भविष्यवाणी युजर्स म्हणाले ". याला स्वतःच भविष्य माहिती आहे का? " असं कोणता ज्योतिषी आहे जो सरळ काळ्या जिभेची बोलतो का" " सगळं स्क्रिप्ट वाचून आला आहे " "फेकू ज्योतिषी " " यावेळी चॅनलला चांगला ज्योतिषी नाही भेटला.. कोणाला आणलं आहे "

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने