सलमान, राणी मुखर्जी घाबरले, ती एकटीच अंडरवर्ल्ड डॉनला नडली! त्यानंतर कधीच...

मुंबई: बॉलीवूडमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून प्रीति झिंटा ही लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रीतीनं देशभरामध्ये आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. बॉलीवूडच्या तीनही खान अभिनेत्यांसोबत काम केले आहे. आज प्रीतिचा वाढदिवस असून तिच्याविषयीचे भन्नाट किस्से आपण जाणून घेणार आहोत.प्रीतिबाबत बॉलीवूडमध्ये एक गोष्ट नेहमीच सांगितले जाते ती म्हणजे तिनं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यामुळे तिला धमक्याही मिळाल्या होत्या. मात्र तिनं नेहमीच आपल्याला जी गोष्ट आवडत नाही, पटत नाही त्याबाबत ठाम भूमिका मांडली आहे. प्रीतीनं आयपीएलमध्येही भाग घेत एक बिझनेसवुमन म्हणून वेगळी इमेज व्हायरल केली होती. त्यावरुन तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला. तिचं कौतूक झालं.मुंबईमध्ये ३१ जानेवारी १९७५ मध्ये जन्म झालेल्या प्रीतिच्या सौंदर्याची बॉलीवूडला भुरळ पडली होती. ती आज तिचा ४८ वा जन्मदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं चाहत्यांनी तिला मोठ्या प्रमाणात शुभेच्छाही दिल्या आहेत. लष्करी कुटूंबात जन्म झालेल्या प्रीतिनं आपल्या आक्रमक स्वभावानं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. तिचे अनेकांबरोबर वादही झाले. मात्र आपली भूमिका ठामपणे मांडण्यात तिनं कधीही माघार घेतली नाही.   लहानपणापासूनच प्रीतीचा टॉम बॉय लूक शाळेमध्ये प्रसिद्ध होता. वडिलांचे छत्र लवकर हपरल्यानं तिच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यानंतर तिनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यात ती यशस्वी झाली. यानंतर तिला बॉलीवूडकडून वेगवेगळ्या ऑफर्स येत गेल्या. दिल से मधून छोट्याशा भूमिकेत दिसलेल्या प्रीतिनं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली.

असं म्हटलं जातं की, चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटाचे निर्माते भरत शहा आणि नाजिम रिझ्वी यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलकडून पैसे मिळाले होते. त्यात प्रमुख भूमिकेत सलमान खान आणि राणी मुखर्जी होती. मात्र जेव्हा कोर्टामध्ये साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा प्रीतीनं पुढाकार घेतला होता. त्यावेळी प्रीतीला सतत धमकीचे फोन येत होते. मात्र तिनं आपला निर्णय काही बदलला नाही.ते प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित होतं तेव्हा ते रेकॉर्डही करण्यात आले होते. यात प्रीतीची भूमिका महत्वाची ठरली. कोणत्याही दबावाला बळी न पडता तिनं साक्ष दिली होती. त्यावेळी सगळं बॉलीवूड सुन्न झालं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने