मोठी बातमी! ठाकरे गट अन् वंचितच्या युतीची अधिकृत घोषणा

मुंबई: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असणाऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा नवा पॅटर्न आज समोर आला आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली आहेत. पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ही घोषणा केली आहे.यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पुढील वाटचालीसाठी एकत्र आलो आहोत. प्रथम देश हीत महत्वाचं आहे. तर यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीची युती फक्त शिवसेनेच्या ठाकरे गटाशी आहे. महाविकास आघाडीशी ही युती नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.दोन्ही शक्तींना एकत्र येण्याची गरज होती. राज्यात भांडवलशाहीचं राजकारण सुरू आहे. तर महाराष्ट्रात महत्वाचे मुद्दे मागे पडले असल्याचंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जिंकणं राजकारण्याच्या हातात नाही पण उमेदवारी देणं त्यांच्या हातात आहे असं आंबेडकर म्हणाले आहेत.तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेतातील भांडण नाहीत तर त्यांच्यासोबत मुद्याची भांडण आहेत असं म्हणतं शरद पवार यांच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं आहे. कारण सध्या ही युती फक्त शिवसेनेसोबतच असून महाविकास आघाडीचं नंतर बघू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने