Urmila Kothare ला लागले समीर वानखेडेंना भेटायचे वेध..कारण सांगत म्हणाली,'मी लवकरच रितसर अपॉइंटमेंट..'

मुंबई: उर्मिला कोठारे गेल्या काही दिवसांपासून आदिनाथ सोबतच्या तिच्या बिघडलेल्या नात्यामुळे चर्चेत होती. हा विषय जरी तात्पुरता थांबला असला तरी उर्मिलानं यावर अद्याप मौन साधलंय हे देखील अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण करत आहे.सिनेमा,मालिकांपासून स्वतःला गेल्या काही वर्षात लांब ठेवलेल्या उर्मिलाचं अचानक मनोरंजन इंडस्ट्रीत सक्रिय होणं हे देखील खूप काही गोष्टी स्पष्ट करत आहे. असो..विषय असा आहे की आता उर्मिला पुन्हा एका नवीन विषयामुळे चर्चेत आली आहे. उर्मिलानं आपल्या कंपास या वेबसिरीजच्या निमित्तानं एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली आहे, या मुलाखतीत उर्मिलानं तिचा आवडता आयपीएस अधिकारी कोण या प्रश्नावर उत्तर देताना समीर वानखेडे यांचे नाव घेतले आहे.प्लॅनेट मराठी या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच एक नवीन वेबसिरीज आपल्या भेटीस येत आहे. 'कंपास' असे या वेबसिरीजचे नाव आहे. यामध्ये उर्मिला कोठारे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.यानिमित्तानं उर्मिलानं एनसीबी मुबंईचे माजी झोनल अधिकारी समीर वानखेडे आपले आवडते पोलिस अधिकारी आहेत आणि वेब सिरीजमधील पोलिस अधिकारीच्या भूमिकेसाठी काही टीप्स घ्यायला आपण लवकरच समीर वानखेडे यांची भेट घेणार आहोत असे देखील सांगितले.उर्मिला त्या मुलाखतीत म्हणाली, ''समीर वानखेडे हे अत्यंत कर्तृत्ववान आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. माझी आणि त्यांची अनेकदा भेट होत असते. 

आमचे आणि त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. पण एक अधिकारी म्हणूनही ते मला आवडतात''.कंपासमधील माझ्या भूमिकेसाठी समीर वानखेडे यांच्याकडून टीप घेण्यासाठी आपण लवकरच रीतसर अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटणार असल्याचं देखील उर्मिला म्हणाली.आता समीर वानखेडे हे आपल्या अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे पती आहेत आणि उर्मिलाचं क्रांतीसोबतचं नातं खूप जवळचं आहे.प्लॅनेट मराठीच्या 'कंपास' या वेबसिरीजचं दिग्दर्शन सुश्रुत भगतनं केलं आहे. यामध्ये उर्मिला कानेटकर-कोठारे सोबत सायली संजीव,Rutuja Bagwe, पौर्णिमा डे,खुशबू तावडे,सुयश टिळक,संग्राम साळवी,सौरभ गोखले,धवल पोकळे,राजेंद्र शिसतकर,गिरीश जोशी,आनंद इंगळे,संजय मोने आदी कलाकार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने