'तुझ्या बापाचा नोकर आहे का...' एमसी स्टॅन अन् अर्चनात राडा...

मुंबई:   बिग बॉस 16: बिग बॉसच्या घरात दररोज कोणत्या न कोणत्या कारणाने स्पर्धकांमध्ये भांडण पाहायला मिळत आहे. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत होते आणि त्यात जर भांडणात अर्चना गौतम सहभागी असेल तर विषय गंभीर होतो.ती कधी काय बोलेल याचा भरोसा नसतो. उरलेली कसर एम सी स्टॅन पुर्ण करतो.यावेळीही असचं काहीसे पाहायला मिळणार आहे. आधीच्या एपिसोडमध्ये किचनमध्ये न येण्याची आणि सगळ्यांशी भांडण करण्याची शपथ घेणारी अर्चना गौतम येत्या एपिसोडमध्ये पाठ फिरवताना दिसणार आहे. आगामी एपिसोडमध्ये अर्चना टीना दत्ता आणि एमसी स्टेन सोबत जोरदार भांडण करतांना दिसणार आहे.अर्चना टीनापेक्षाही जास्त जोरात स्टॅनशी भांडतांना दिसणार आहे. एमसी स्टॅनने शोमध्ये प्रवेश केल्यापासून त्याने एकही काम केललं नाही या गोष्टीचा तिला राग आहे. ती म्हणते, ' लोकांच्या मतांवर तो किती काळ राहणार? मी त्याच्या सर्व चाहत्यांना सांगते की त्याने आजपर्यंत झाडूही मारलेला नाही. हे ऐकून स्टॅन अर्चनाला म्हणतो, 'मी तुझ्या बापाचा नोकर आहे का? बिग बॉस तुझ्या आईचाच आहे.अर्चना आणि स्टॅन यांच्यातील भांडण अतिशय वैयक्तिक होतं. या फाईटमध्ये स्टॅन अर्चनाच्या आई-वडिलांवर भाष्य करताना दिसणार आहे. स्टॅनचं बोलणं ऐकल्यानंतर अर्चनाने स्टॅनला लाज वाटत नाही का, असं विचारलं. ती म्हणते, 'तुझी आई आहे की नाही? जो दुसऱ्याच्या आईचा आदर करू शकत नाही, तो वाईट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने