सलमानच्या बिग बॉसमध्ये किंग खानची होणार एन्ट्री! करणार 'पठाण'चे प्रमोशन

मुंबई:   शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उद्या म्हणजेच 10 जानेवारीला पठाण या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे, मात्र आजपर्यंत चित्रपटाच्या एकाही स्टारने मैदानावर त्याचे प्रमोशन सुरू केलेले नाही. कलाकार आणि निर्माते अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. मात्र, आता अशी बातमी आहे की शाहरुख खान सलमान खानच्या शो बिग बॉस सीझन 16 मधून पठाणचे प्रमोशन सुरू करू शकतो.मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खान सलमानच्या शो बिग बॉसमध्ये पठाणचे प्रमोशन करताना दिसणार आहे. हा शो 19 जानेवारीला प्रसारित होणार आहे. आता दोन्ही खान एकत्र दिसणार तेव्हा शोची मजा द्विगुणित होणार आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान देखील त्याच्या दिलवाले चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानच्या या रिअॅलिटी शोमध्ये गेला होता. इतकेच नाही तर दीपिका पदुकोणने बिग बॉसमध्ये 'X X X, जैंडर केज' चे प्रमोशनही केले आहे.
देशाच्या अनेक भागात पठाणबाबत गदारोळ सुरू आहे. अनेक संघटना या चित्रपटाच्या विरोधात उतरल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरही चित्रपटाविरोधात बायकॉटचा ट्रेंड सुरू आहे. बेशरम रंग या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाल्यापासून हा संपूर्ण वाद सुरू झाला. गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकिनीचा रंग भगवा असून त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. हा सीन हटवण्याची मागणी आता चित्रपटावरील बायकॉटपर्यंत पोहोचली आहे.बिग बॉसमध्ये प्रमोशनचे एक कारण म्हणजे सलमान खानही पठाणमध्ये दिसणार असल्याचे मानले जात आहे. शाहरुखच्या चित्रपटात सलमानने कॅमिओ केला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही स्टार्सना एकाच व्यासपीठावर पाहणे चित्रपटासाठी फायदेशीर ठरू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने