आशुतोष लवकरचं चढणार बोहल्यावर! अरूंधतीने दिली प्रेमाची कबुली..

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका ' आई कुठे काय करते'  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेची कथा पुन्हा एकदा अरुंधती आणि आशुतोष यांच्याभोवती फिरतांना दिसत आहे.अरुंधतीच्या आयुष्यात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. पण चाहते ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण आता आला आहे. अरुंधतीने आशुतोषला प्रेमाची कबुली दिली आणि आशुतोषने देखील त्याचं अरुंधतीवरचं प्रेम मान्य केलं.'आई कुठे काय करते' या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात अरुंधती आशुतोषला फोन करते. दोघेही एकमेकांना फोन करतात. त्यानंतर अरुंधती आशुतोषला भेटते. त्यांला 'मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे.' असं सांगते. तेव्हा आशुतोष फारच आनंदी होतो. तो म्हणतो, 'तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची मी तूला खात्री देतो अरुंधती.' अखेर आता दोघांच्याही मनातील प्रेम ओठांवर आलं आहे.

तर दुसरीकडे अनिरुद्धाचा डाव फसला आहे, अनिरुद्ध अनुष्काला अरुंधतीच्या नात्याबद्दल सांगतो त्याला वाटत आता त्या दोघांचं नात तुटेल. अरुंधती घरी येताच तो तिला विचारतो, 'मग कधी आहे लग्न' त्यावर अरुंधती म्हणते कि, 'मी स्वतः सगळं सांगेन तुम्हाला पण वेळ आल्यावर अरूंधतीच्या उत्तराने अनिरुद्ध चांगलाच बिथरलेला दिसतो.मात्र आता प्रेक्षकांना आतुरता आहे ती अरूंधती आणि आशुतोषच्या लग्नाची. लवकरचं मालिकेत या दोघांच लग्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने