बल्ले बल्ले! अमृता फडणवीसांनी आळवला पंजाबीचा सूर; चाहत्यांमध्ये उत्साह

मुंबई : प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांच्या एका ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. काही पंजाबी ओळींसह अमृता फडणवीसांनी केलेलं हे ट्वीट चाहत्यांची उत्सुकता ताणणारं ठरत आहे.आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. हे गाणं पंजाबीत असणार, हे या ट्वीटवरुन कळत आहेत. यासोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला आहे."अज मैं मूड बणा लेया ए ए ए ,तेरे नाल ही नचणा वे", असे या गाण्याचे बोल असतील असं या ट्वीटवरुन समजत आहे. ६ जानेवारीला हे गाणं रिलिज होणार आहे, असंही त्यांनी या ट्वीटमधून जाहीर केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने