किती श्रीमंत आहे अंबानीची सुन? वाचाल तर थक्क व्हाल

मुंबई : देशाचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका हिच्यासोबत आज साखरपुडा पार पडणार आहे. त्यामुळे लवकरच राधिका अंबानींच्या घरची धाकटी सून होणार आहे.पण तुम्हाला राधिका मर्चंटविषयी माहिती आहे का? आज आपण या विषयीच जाणून घेणार आहोत.राधिकाचा जन्म 18 डिसेंबर 1994 ला झाला. 28 वर्षीय राधिका ही  एक शास्त्रीय नृत्यांगना आहे. याशिवाय तिला पोहण्याची आणि पुस्तकं वाचण्याचीही आवड आहे. अर्थशास्त्रात बॅचलर डिग्री घेतलेली राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून पद्युत्तर शिक्षण पूर्ण केले.याच दरम्यान अनंत आणि राधिका यांची भेट झाली होती. अनंत शिवाय व्यतिरिक्त राधिकाचा नीता अंबानी, श्लोका आणि ईशा यांच्यासोबत खूप छान बॉंड आहे.

राधिका किती श्रीमंत आहे?

राधिका ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ती लक्झरी लाईफ जगते. ती खूप स्टाईलीश आहे. याशिवाय सध्या ती एन्कोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते. याशिवाय एन्कोर हेल्थकेअर कंपनीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर ती तिच्या वडिलांना महत्त्वाचे सल्लेही देते. राधिकाचे वडिल वीरेन मर्चंट यांच्याकडे 755 कोटींहून अधिक मालमत्ता आहे. याशिवाय राधिकाची नेटवर्थ 8-10 कोटी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने