राफेल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

ऑस्ट्रेलिया: गतविजेता राफेल नदाल दुसऱ्या फेरीत मॅकेन्झी मॅकडोनाल्डकडून पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडला आहे.नदालला ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डने नदालचा 6-4, 6-4, 7-5 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. 36 वर्षीय नदालला सामन्यादरम्यान पाठीच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. यामुळे त्याला काहीकाळ ब्रेकही घ्यावा लागला होता.विश्रांतीनंतर नदाल पुन्हा कोर्टवर परतला होता. मात्र, खेळताना नदालची ती शैली चाहत्यांना दिसून आली नाही आणि त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.रफाएल नदालने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब जिंकला होता. गेल्या स्पर्धेत नदालने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनवर स्वतःचे नाव कोरले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने