आई आजारी असतांनाच राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीशी केलं लग्न! फोटो व्हायरल

मुंबई:  'ड्रामा क्वीन' म्हटली जाणारी टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत बिग बॉसच्या बाहेर आल्यापासून चर्चेत आहे.आता तिच्याशी संबधित एक मोठी बातमी समोर येत आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे.दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या गळ्यात माळ आहे आणि त्याच्या विवाहाच प्रमाणपत्रासोबत पोज देताना दिसत आहेत. ही बातमी समजल्यानंतर राखीचे चाहते खूप खूश आहेत. मात्र, राखी किंवा आदिल यांच्याकडून अद्याप लग्नाची अधिकृत घोषणा झालेली नाही.दुसऱ्या फोटोत राखी सावंत कागदपत्रांवर सही करताना दिसत आहे. हे मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्यावर राखी सही करत असल्याचं बोललं जात आहे. आदिलही त्याच्या जवळच बसला आहे.राखी आणि आदिलच्या विवाह प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्र देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर दोघांचे पासपोर्ट आकाराचे फोटो आहेत. मात्र, यावर लग्नाची तारीख 29 मे 2022 लिहिली आहे. त्यावर आणखी एक तारीख नमूद केली आहे – 2 जुलै 2022. राखी आणि आदिलचे लग्न गेल्या वर्षीच झाले होते का असा प्रश्न आता लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने