"माझ्या पांढऱ्या शर्टाचा रंग लाल करण्याची संधी त्यांना दिली पण..."

जम्मू काश्मीर: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या श्रीनगरमध्ये आहे. आजचा या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी बोलताना राहुल गांधी यांनी काश्मीरमधल्या नागरिकांचे आभार मानले. काश्मीरच्या लोकांनी आपल्याला ग्रेनेड नाही तर प्रेम दिलं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये बर्फाचा वर्षाव होत असताना सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी काश्मिरी लोकांचे आभार मानले. त्यांनी काश्मिरीयत या विचाराचं समर्थन केलं. राहुल गांधी म्हणाले, "माझ्या लहानपणापासून मी सरकारी घरात राहतोय. माझं स्वतःचं घर नाही. मी कधीच इमारतीला घर मानलं नाही. घर माझ्यासाठी विचार आहे. जगण्याची विचारांची पद्धत आहे. इथं ज्याला कश्मिरीयत म्हणतात, त्याला मी घर म्हणतो. कश्मिरीयत म्हणजे खोलात विचार केला तर त्याला शून्यता म्हणू शकतो. स्वतःवर विचारांवर आक्रमण करणे, लोकांना जोडणे तर दुसरीकडे इस्लाममध्ये फना म्हटलं जातं. विचार तोच आहे. पृथ्वीवर या दोन विचारधारांचं अनेक वर्षांपासून नातं आहे, याला कश्मिरीयत म्हणतात. हाच विचार इतर राज्यांमध्येही आहे."राहुल गांधी पुढे म्हणाले, "गंगेच्या किनाऱ्यावर आमचं घर आहे, कश्मिरीयत विचाराला ते गंगेत घेऊन गेले. तिथे गंगेत टाकलं. उत्तर प्रदेशात त्याला गंगा जमुना तहजीब म्हणतात. तिथेही हा विचार ते घेऊन गेले. मला सुरक्षाकर्मी म्हणाले की तुम्ही सगळ्या देशात फिरू शकता, जम्मूतही फिरू शकता, पण शेवटचे चार दिवस काश्मीरमध्ये, तिथे तुम्हाला गाडीने जायला हवं. वेणुगोपाल पण म्हणाले, संयोजन समितीतल्यांनीही सांगितलं. पायी चालाल तर ग्रेनेड फेकलं जाईल. मी म्हटलं मी माझ्या घरी चाललोय. चार दिवस पायी चालेन. घरच्या लोकांमध्ये चालेन.राहुल गांधी पुढे म्हणाले, "जे माझा द्वेष करतायत ,त्यांना माझ्या सफेद शर्टांचा रंग लाल करण्याची एक संधी द्यावी, असा विचार मी केला. माझ्या घराने मला शिकवलं, गांधीजींनी शिकवलं की जगायचं असेल तर न घाबरता जगा, नाहीतर जगू नका. म्हणून मी संधी दिली. 

बदला शर्टचा रंग, लाल करा. बघून घेऊ .पण मी जो विचार केला तेच झालं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड नाही, तर प्रेम दिलं, मिठी मारली. मला आनंद झाला की त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेमाने, अश्रूंनी माझं इथं स्वागत केलं. मी आता इथल्या सर्वांना एक सांगून इच्छितो, मी हिंसेला समजू शकतो, मी सहन केली आहे, पाहिली आहे. जो हिंसा सहन करत नाही, ज्यांने पाहिली नाही, त्यांना कळणार नाही. मोदी, शाह, आरएसएसचे लोक ते समजू शकत नाहीत."माझ्या लहानपणापासून मी सरकारी घरात राहतोय - माझंय स्वतःचं घर नाही -मी कधीच इमारतीला घर मानलं नाही - घर माझ्यासाठी विचार आहे - जगण्याची विचारांची पद्धत आहे. - इथं ज्याला कश्मिरीयत म्हणतात, त्याला मी घर म्हणतो - कश्मिरीयत म्हणजे शंकराचा विचार एकीकडे आणि खोलात विचार केला तर त्याला शून्यता म्हणू शकतो - स्वतःवर विचारांवर आक्रमण करणे, लोकांना जोडणे तर दुसरीकडे इस्लाममध्ये फना म्हटलं जातं - विचार तोच आहे. पृथ्वीवर या दोन विचारधारांचं अनेक वर्षांपासून नातं आहे, याला कश्मिरीयत म्हणतात - हाच विचार इतर राज्यांमध्येही आहे -

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने