अभिनयाची 'राणी' पुन्हा येतेय.. नवीन भूमिका आणि नवीन सिनेमाची घोषणा

मुंबई: राणी मुखर्जी हि गेले अनेक महिने अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. बॉलिवूड मधली हि मर्दानी अभिनेत्री नवी सिनेमात कधी दिसणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. राणीचे चाहते सुद्धा तिच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अखेर राणीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. राणीचा नवीन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.राणीच्या आगामी सिनेमातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात राणीने सुंदर पिवळी साडी नेसली असून तिच्या कडेवर एक बाळ आहे आणि शेजारी एक मुलगा बसलाय. राणी या दोघांसोबत सेल्फी काढतेय. मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे  असं राणीच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. सध्या राणीच्या आगामी सिनेमातला लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालायमिसेस चॅटर्जी vs नॉर्वे या सिनेमातला राणीचा आणखी एक लूक व्हायरल झालाय. गुलाबी साडी परिधान केलेल्या राणीच्या हातात एक टेडी बियर आहे, आणि भावुक नजरेने राणी पाहतेय. एकूणच राणीचा हा आगामी सिनेमा वेगळं कथानक घेऊन येतोय आणि राणीचा सुद्धा या नव्या सिनेमात जबरदस्त अभिनय अविष्कार पाहायला मिळणार, हे स्पष्ट होतंय.बॉलिवूड मधले सुप्रसिद्ध दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्याकडे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आहे. राणीने शेवट 'बंटी और बबली २' सिनेमात काम केलं. अभिनेता सैफ अली खान सोबत राणीची जोडी जमली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी झाला तरीही राणीच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं. मिसेस चॅटर्जी vs नॉर्वे हा सिनेमा १७ मार्च २०१३ ला रिलीज होतोय.

राणीने २१ एप्रिल २०१४ ला सध्या यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा असलेले आदित्य चोप्रा सोबत लग्न केलं. लग्नानंतर राणी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेईल असं वाटलं होतं. परंतु लग्नानंतर काहीच महिन्यात आलेल्या मर्दानी सिनेमातून राणीने पोलीस ऑफिसरची भूमिका साकारून दमदार कमबॅक केलं. राणीचा नवा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होणार कि फ्लॉप हे थोड्याच महिन्यात कळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने