रश्मिकाचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून पब्लिक तापलं..म्हणाले,'ही तर साऊथ मधली..'

मुंबई: साऊथ सिनेमातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानानं 'पुष्पा' सिनेमातील आपल्या अदाकारीनं देशातील कानाकोपऱ्यात आपलं नाव पोहोचवलंय. आज देशात नाही तर जगभरात तिच्या चाहत्यांची मोठी संख्या पहायला मिळते.बॉलीवूडमध्ये देखील सध्या तिची चर्चा रंगली आहे. तिनं 'गूडबाय' सिनेमातून हिंदी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. एकीकडे ती इतकी प्रसिद्ध होताना दिसतेय तिथे दुसरीकडे तिच्या विरोधात सूर काढला जातोय.लोक तिला 'ओव्हर अॅक्टिंग की दुकान' म्हणताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रश्मिका मुंबई एअरपोर्टवर दिसली होती आणि तिथं तिनं ज्या काही आपल्या अदा दाखवल्या त्याची जोरदार चर्चा आता रंगली आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या त्या अदांना भले पसंत केलं असेल पण काही लोकांनी मात्र तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.रश्मिका मंदाना पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये मुंबई एअरपोर्टवर दिसली. तिनं पापाराझीसोबत खूप चांगल्या पद्धतीनं संवाद देखील साधला. आणि तिचा हा अंदाज पाहून तिचे चाहते तिचं कौतूक करु लागले.पण काही लोकांनी मात्र रश्मिकाच्या या वागण्याला नावं ठेवली आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'एवढी ओव्हरअॅक्टिंग कशासाठी,कुणाला दाखवायला? डिसलइक बटण कुठे आहे?' ,तर आणखी एकानं कमेंट करत लिहिलं आहे की,'ओव्हर अॅक्टिंग की दुकान..ही तर साऊथ सिनेमातील बॅन केलेली अभिनेत्री. आता हिंदी इंडस्ट्री बिघडवायला आली आहे.. एक सिनेमा फ्लॉप झाला. पुढचा मिशन मजनू आणि त्यानंतर एनिमल...आहेतच फ्लॉप होण्यासाठी तयार..'

रश्मिका मंदानानं तेलुगु,कन्नड,हिंदी आणि तामिळ सिनेमातून काम केलं आहे. तिनं २०१६ मध्ये 'किरिक पार्टी ' नावाच्या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'गीता गोविंदा','पुष्पाःद राइज', आणि 'सिता रामम' सारख्या सिनेमातून ती दिसली.तिनं 'गूडबाय' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं ..पण सिनेमा बॉक्सऑफिसवर अक्षरशः झोपला. आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती 'मिशन मजनू' आणि रणबीर कपूरसोबत 'एनिमल' सिनेमातून ती दिसणार आहे. याव्यतिरिक्त अल्लू अर्जून सोबत पुन्हा एकदा 'पुष्पा २' सिनेमात ती दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने