बिग बॉसचं घर आहे की पाकिस्तान.. 50 हजाराचं पीठ, 70 हजाराची भाजी.. रेशन पडलं महागात!

मुंबई: बिग बॉस16 शोचा आता शेवटचा टप्पा जवळ आला आहे. कारण फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात या खेळाची अंतिम फेरी रंगणार आहे. त्यामुळे रोज नवीन काहीतरी राडा या घरात सुरू आहे आणि रोज काहीतरी नवीन बघायला मिळतं आहे. पण आता ही खेळ चांगलाच कठीण होऊन बसलाय. रेशन मिळवण्यासाठी घरातील रहिवाशांना आता बक्षीसाची रक्कम गमवावी लागणार आहे. त्यामुळे घरात मोठा राडा झाला आहे.झालं असं की, बिग बॉसने घरच्यांना लागणाऱ्या रेशनवर पैसे आकरले आणि या रेशनची किंमत लाखो रुपये ठेवली. या रेशनमध्ये 50 हजार रुपये किलोने पीठ मिळत आहे. तर भाजीची किंमत 60 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यावेळी रेशनचे किंमत पाहता येथे रेशन नव्हे तर सोने विकले जात असल्याचे दिसते. ही रेशन खरेदी करण्यासाठी स्पर्धकांनी 8 लाख 20 हजार रुपये दिले. पण ही रक्कम त्यांच्या बक्षिसाच्या रकमेतून वजा होणार असल्याने 8 लाख 20 हजार रुपये स्पर्धकांनी गमावले आहेत. त्यामुळे आता बक्षीसाची रक्कम म 21 लाख 80 हजार झाली आहे.

त्यातच या महागाईच्या रेशन टास्कवरून शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ' शिव अर्चनाला बोलतो तुझे विचार खुप बेकार आहेत. तुला लाज वाटली पाहिजे. तर अर्चना बोलते, जो जास्त खातो तो बोलतो..'यामध्ये रेशनमुळे घरातील सदस्य काही काळ नाराजही झाले. शिवाय त्यांच्यात वादही झाले. हा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या पाकिस्तान मध्ये प्रचंड महागाई आहे, त्यामुळे बिग बॉस च्या घराचे पाकिस्तान झाले की काय अशी खिल्ली नेटकऱ्यांनी उडवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने