'बाबा आज तुम्ही हवे होतात!' अपूर्वाच्या डोळ्यात पाणी...

मुंबई:  बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले काल पार पडला. त्यातील अनपेक्षित निकालानं प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. सगळ्यांची लाडकी अपूर्वा ही यावेळच्या बिग बॉसची विजेती होईल असे सर्वांना वाटत होते. ती आणि किरण माने यांच्यातच खरी स्पर्धा असेल असाही प्रेक्षकांना, चाहत्यांना अंदाज होता.अपूर्वानं बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. अनेकांशी तिनं पंगा घेतला. पण बिग बॉसच्या घरात टिकायचे असेल तर कशापद्धतीनं खेळलं पाहिजे हे अपूर्वाला माहिती होते. त्यामुळे शेवटपर्यत ती मोठ्या उत्साहानं खेळत होती. निर्णायक क्षणी मात्र तिला नशिबानं धक्का दिला. आणि अपूर्वाच्या डोळ्यात पाणी आले.किरण माने, अक्षय केळकर आणि अपूर्वा माने या तिघांची नावं शेवटी जाहीर झाली. त्यांच्यामधून विजेत्याचे नाव महेश मांजरेकर जाहीर करणार होते. त्यामध्ये किरण माने हा बाहेर पडल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. अपूर्वा आणि अक्षय हे दोघेच बिग बॉसच्या घरात होते. त्यावेळी मांजरेकर यांनी अपूर्वा, अक्षयला तुम्ही बिग बॉसच्या घरातील लाईट्स बंद करुन बाहेर येण्यास सांगितले. तेव्हा अपूर्वा भलतीच भावूक झाली होती.मला प्रेक्षकांकडून खूप सहकार्य मिळालं. त्यांच्यामुळे फायनल तीनमध्ये आली आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हे सारे शक्य झाले. अपूर्वानं भावूक होत आपल्याला यावेळी बाबांची खूप आठवण येत असल्याचे सांगितले. ती म्हणाली, या क्षणाला मला माझ्या बाबांची खूप आठवण येते आहे. त्यांना कळालं असतं की, त्यांची अपूर्वा किती मोठी झाली आहे ते, त्यांना खूप आनंद झाला असता. अपूर्वाच्या पोस्टवर देखील चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.चाहत्यांनी अपूर्वाला तू खूप चांगली खेळलीस, तू नाराज होऊ नकोस. थोड्याशा फरकानं तुझा पराभव झाला आहे. त्यामुळे फार मनाला लावून घेऊ नकोस. अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी अपूर्वाला दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने