राखी सावंतच्या लग्नानं टेन्शनमध्ये आलाय भाऊ राकेश..म्हणाला..

मुंबई:  बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या आपल्या लग्नामुळे मोठी चर्चेत आहे. राखीनं काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेंड आदिल खान सोबतचे वेडिंग फोटो शेअर करत सगळ्यांना हैराण करुन सोडलं. राखीच्या वेडिंग फोटोजनंतर तिचे मॅरेज सर्टिफिकेट व्हायरल झाले,ज्यावर तिचं नाव 'फातिमा' असं लिहिलेलं दिसलं.बरं एवढंच नाही त्यासोबत खुलासा झाला की तिनं हे लग्न जवळपास ७ महिन्यापूर्वीच म्हणजे २०२२ मध्ये केलं होतं. यादरम्यान आता राखीचा भाऊ राकेशची प्रतिक्रिया समोर आली आहे. 
राखी सावंतचा भाऊ राकेशला जेव्हा तिच्या नाव बदलण्याविषयी प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला, ''मला हे माहित नाही. ते तिचं वैयक्तिक आयु्ष्य आहे,पती-पत्नीमध्ये काय घडतं हे खूप पर्सनल आहे. आम्हाला माहित नाही,पण जर राखीनं नाव बदलण्याचा निर्णय घेतला असेल तर काहीतरी विचार करुन घेतला असेल''. पण आता राखीच्या चाहत्यांना मात्र तिनं खरंच नाव बदललं आहे का याविषयी जाणून घ्यायचं आहे.राखीच्या सीक्रेट वेडिंगविषय़ी राकेश म्हणाला की,''आम्ही सगळे टेन्शनमध्ये आहोत. राखी आमच्या सगळ्यात लहान आहे आणि तिनं आयुष्यात खूप दूःख भोगलं आहे. बिग बॉसमध्ये मागच्या वेळेस रितेशने देखील तिचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि ती पूर्णपणे तुटली. तेव्हा आम्हाला देखील धक्का बसला होता. त्यामुळे यावेळी राखीनं रितसर लग्न केलं''.

माहितीसाठी इथं सांगतो की राखी सावंतनं पहिलं लग्न रितेश राजसोबत केलं होतं. बिग बॉस १५ मध्ये तिनं आपलं हे मोठं सीक्रेट समोर आणलं होतं. रितेशपासून वेगळं झाल्यावर राखी सावंतने आता आदिल खानशी लग्न केलं आहे. आ्रता त्या लग्नावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.आदिल आणि राखीचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होताना दिसत आहेत. आणि यादरम्यान बातमी समोर येतेय की राखी सावंत प्रेग्नेंट आहे. राखी आता यावर रिअॅक्ट झाली आहे.एका मुलाखतीत राखीला तिच्या प्रेग्नेंसीविषयी विचारले असता तिनं 'नो कमेंट्स' असं उत्तर दिलं. राखीच्या या उत्तरानं तिचे चाहते मात्र हैराण झाले आहेत. कारण राखीनं स्पष्ट नकारही दिलेला नाही.. ना राखीनं यावर होकाराची मोहोर उमटवलीय. पण राखी पुढच्या काही दिवसांत या बातमीवरही स्पष्टपणे बोलेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने