कोण आहे एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड बुबा? जाणून घ्या तिचं खरं नाव

मुंबई:  ‘बिग बॉस’च्या १६ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. अशातच सर्व स्पर्धक फिनाले विकमधील आपली जागा निश्चित करण्यासाठी गेम खेळताना दिसत आहेत. सध्या शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निमृत अहलूवालिया, अर्चना गौतम, सौंदर्या शर्मा, शालीन भानोत, टीना दत्ता आणि सुंबूल तौकीर खान हे स्पर्धक बिग बॉसच्या घरात आहेत. घरात सर्वात शांत, पण मोजक्याच वादांमुळे चर्चेत राहिलेला स्पर्धक एमसी स्टॅन आहे. एमसी स्टॅन हा रॅपर असून त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे.एमसी स्टॅन घरात त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल बऱ्याचदा बोलताना दिसतो. तो तिला बुबा नावाने हाक मारतो. घरातील स्पर्धकांनाही त्याने तिचं नाव बूबा असल्याचं सांगितलं आहे. मागच्या आठवड्यात स्टॅनची आई बिग बॉसच्या घरात आली होती. यावेळी स्टॅन व बुबाचं लवकरच लग्न होणार असल्याचं ती म्हणाली होती. स्टॅननेही तिच्याबद्दल आईला विचारलं होतं. पण ही बुबा नक्की कोण आहे, तिचं खरं नाव काय असा प्रश्न स्पर्धकांना तसेच स्टॅनच्या चाहत्यांनाही पडला आहे. तर, स्टॅनच्या गर्लफ्रेंडचं खरं नाव काय आहे, ती काय करते, याबद्दल जाणून घेऊयात. ‘न्यूज १८ हिंदी’ने दिलेल्या माहितीनुसार, बुबाचं खरं नाव अनम शेख असून ती २४ वर्षांची आहे. त्याने बुबासाठी त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप केलं होतं.

दरम्यान, एकदा स्टॅनने घरातील सदस्यांना एक किस्सा सांगितला होता. त्याच्या हिंदी टोनमध्ये स्टॅन म्हणाला, “तिला मागणी घालायला गेलो होतो आम्ही…गँगस्टर लोक… आम्ही जवळपास ३०-४० जण गेलो आणि तिच्या घराखाली पोहोचलो…लोक विचारू लागले काय झालं?’ म्हटलं काही नाही, आम्ही मुलीला मागणी घालायला आलोय. तिच्या घरासमोर आमच्या गाड्या आणि ३०-४० लोक उभे होतो. मी म्हणालो, तुमच्या पोरीचा हात सन्मानाने माझ्या हातात द्या, नाही तर मी तिला पळवून नेईल. बघाच तुम्ही. तिची आई म्हणाली, ‘कोण आहेस रे तू? घरी जा आणि आई-वडिलांना बरोबर घेऊन ये. कोण आहेत हे लोक, कुठूनही येतात…आणि हो यापुढे आमच्या घरी येऊ नकोस.’ मी चांगलं करायला गेलो होतो आणि सगळं उलटं झालं,” असं स्टॅनने सांगितलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने