केजरीवालांना त्यांच्याच सरकारचा मोठा धक्का; 'आप'ला बजावली 164 कोटी वसुलीची नोटीस!

नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पक्षाचं  सरकार आणखी अडचणीत सापडल्याचं दिसतंय. अरविंद केजरीवाल  यांना त्यांच्याच सरकारचा मोठा धक्का बसलाय.दिल्ली सरकारच्या DIP म्हणजेच, माहिती आणि प्रचार संचालनालयानं केजरीवालांना (आप सरकार) सुमारे 164 कोटी रुपयांची वसुली नोटीस जारी केलीये. जी 10 दिवसांच्या आत जमा करण्यास सांगितलंय. प्रत्यक्षात, सरकारी जाहिरातींच्या आडून राजकीय जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाला एकूण 163.62 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आलीये.
दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना  यांनी मुख्य सचिवांना सरकारी जाहिरातींच्या नावाखाली प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींसाठी आम आदमी पक्षाकडून 97 कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही घडामोड घडलीये.उपराज्यपालांच्या निर्देशानंतर, दिल्ली सरकारच्या माहिती आणि प्रचार संचालनालयानं ही नोटीस जारी केलीये.माहिती आणि प्रचार संचालनालयानं (DIP) जारी केलेल्या वसुलीच्या नोटीसमध्ये रकमेवरील व्याजाचा समावेश आहे.दिल्लीतील सत्ताधारी AAP नं 10 दिवसांच्या आत संपूर्ण रक्कम भरणं बंधनकारक असणार आहे. याआधीही दिल्लीचे एलजी विनय कुमार सक्सेना यांनी आम आदमी पार्टी आणि सरकारला अनेक धक्के दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने