शाहरुख खान ‘पठाण’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार; प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा

मुंबई:  शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चित्रपटातील गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद रंगला आहे. चित्रपटाचं दुसरं गाणंसुद्धा प्रदर्शित झालं असून त्यावरही लोकांनी प्रचंड टीका केली आहे. एकीकडे ‘पठाण’साठी शाहरुखने इतर कामं थांबवली असल्याचं वृत्त समोर येत आहे तर दुसरीकडे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.‘पठाण’च्या ट्रेलरची शाहरुखचे चाहते आणि चित्रपटप्रेमी अत्यंत आतुरतेने वाट पहात आहेत. काहीच दिवस प्रदर्शनासाठी शिल्लक राहिलेले असतानाही या चित्रपटाचा ट्रेलर न आल्याने सगळेच संभ्रमात पडले आहे. तसेच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात काही बदल सुचवल्याने ‘पठाण’ चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशातच आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.प्रसिद्ध अभिनेता आणि स्वघोषित समीक्षक कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेने शाहरुखच्या ‘पठाण’बद्दल मोठा खुलासा केला आहे. केआरकेने ‘पठाण’ पोस्टपोन होणार असल्याची बातमी दिली आहे. ट्वीट करत तो म्हणाला, “पठाण चित्रपटाचे नावसुद्धा बदलण्यात येणार आहे, भगव्या रंगाची बिकिनीसुद्धा बदलली जाणार आहे. आता तर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होणार आहे.”याआधीच्या ट्वीटमध्येसुद्धा केआरकेने आदित्य चोप्रा आणि शाहरुख खान यांना टॅग करत ‘पठाण’बद्दल अशीच भविष्यवाणी केली होती. आता या नवीन ट्वीटमुळे केआरकेला पुन्हा सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. ‘पठाण’चा ट्रेलर आत्तापर्यंत प्रदर्शित व्हायला हवा होता, त्याविषयी अजूनही कोणती अधिकृत घोषणा न झाल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाभोवती प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने