खुशखबर! अवतार आणि ब्लॅक पँथर OTT वर होणार प्रदर्शित

मुंबई :आजचे युग पूर्वीपेक्षा बरेच वेगळे आहे. याआधी एखादा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चाहत्यांना तो पाहता नाही आला, तर तो पुन्हा टीव्हीवर येण्याची वाट पाहावी लागायची. पण आज काळ बदलला आहे. आज ओटीटीचे युग आहे. या काळात, जर तुम्ही एखादा चित्रपट नसेल पाहिला तरी तुम्ही तो ओटीटी वरही पाहू शकता. अलीकडेच, दोन मोठ्या हॉलिवूड चित्रपटांच्या ओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली आहे. याच्या मदतीने तुम्ही घरी बसून या चित्रपटांचा आनंद घेऊ शकता.2022 मध्ये आलेल्या 'ब्लॅक पँथर वकांडा फॉरेएव्हर' या प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट सहाव्या क्रमांकावर होता. आता चाहत्यांना हा चित्रपट लवकरच ओटीटी वर देखील पाहता येईल. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रत्येक भाषेत प्रदर्शित होणार असल्याची माहिती डिस्नेकडून शेअर करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे डिस्ने प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन आहे ते घरी बसून विनामूल्य या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.



2022 मधील सर्वात यशस्वी चित्रपट, अवतार अजूनही थिएटरमध्ये जबरदस्त कमाई करत आहे. परंतु ज्यांना हा चित्रपट कोणत्याही कारणाने पाहता आला नाही किंवा हा चित्रपट इतका आवडला आहे की त्यांना तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो, त्यांना काही काळानंतर ही सुवर्णसंधी मिळू शकते. ओटीटी वर प्रदर्शित करण्यासाठी या चित्रपटाने डिस्ने प्लस हॉटस्टारचे राइट्स आधीच घेतले आहेत. अहवालांवर विश्वास ठेवला तर, तो एप्रिल 2023 पर्यंत प्रसारित केला जाईल.अवतार चित्रपटाने भारतातही चांगली कमाई केली आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट लवकरच अ‍ॅव्हेंजर एंडगेमचा रेकॉर्ड मोडू शकतो. 2019 मध्ये रिलीज झालेला एव्हेंजर एंडगेमचा हा असाच एक हॉलिवूड चित्रपट आहे ज्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सर्वाधिक कमाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने