भाजप नेत्याकडून अदानींची तुलना फ्रान्सच्या राजाशी; म्हणे "मी जगलो तरच…"

दिल्ली: उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमुहाबद्दल हिंडेनबर्ग कडून गंभीर आरोप केल्यानंतर अदानी उद्योग समुहाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यानंदर अदानी यांच्याकडून हिंडेनबर्गच्या या रिसर्च रिपोर्टला गौतम अदानी समुहाने ४१३ पानांचे  उत्तर दिले आहे. दरम्यान भाजपचे नेते माजी खासदार सुब्रम्हण्यम स्वामी अदानी यांना टोला लगावला आहे.सुब्रम्हण्यम स्वामी यांनी फांसचा राजा किंग लुईस याचा संदर्भ देत अदानींना टोला लगावला आहे. भारतावर सुनियोजित हल्ला!! फ्रांसचा राजा किंग लुईस म्हणाला होता “Apre moi Le deluge” अदानी यांनीही तेच म्हटले आहे; "मी जिवंत असेल तरच भारत देखील"हिंडेनबर्गचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी उद्योगसमूहाला तब्बल ४.२ लाख कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. यानंतर अदानी समूहाकडून ४१३ पानांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच यामध्ये त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप देखील फेटाळून लावले आहेत.अदानी काय म्हणालेत?

अदानी उद्योगसमूहाने हा रिपोर्ट म्हणजे भारताविरूद्धचा सुनियोजित कट असल्याचे म्हटले आहे. हिंडेनबर्गचा हा रिपोर्टचा मूळ उद्देश हा केवळ अमेरिकन कंपनीला फायदा मिळवून देणे हा होता. हा रिपोर्ट म्हणजे केवळ एका विशिष्ट कंपनीवर केलेला अवास्तव हल्लाच नाही तर, भारताचे स्वातंत्र्य, अखंडता, गुणवत्ता, विकास आणि महत्त्वाकांक्षेसह भारतीय संस्थांवर पद्धतशीर हल्ला असल्याचे अदानींनी म्हटले आहे.

हिंडनबर्ग रिपोर्ट काय आहे?

अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या नकारात्मक अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.दरम्यान हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहात अनेक अडचणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंट फ्रॉडमध्ये गुंतलेला आहे असे सांगण्यात आले आहे.तसेच हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात अदानी समूहाला ८८ प्रश्न विचारले आहेत. या अहवालात अदानी समूहाला विचारण्यात आले आहे की, गौतम अदानी यांचे धाकटे बंधू राजेश अदानी यांना समूहाचे एमडी का करण्यात आले आहे, तर त्यांच्यावर कस्टम करचोरी, बनावट आयात दस्तऐवज आणि अवैध कोळसा आयात केल्याचा आरोप आहे.हिरे व्यापार घोटाळ्यात नाव आल्यानंतरही गौतम अदानी यांचे मेहुणे समिरो व्होरा यांना अदानी ऑस्ट्रेलिया विभागाचे कार्यकारी संचालक का करण्यात आले, असे अनेक प्रश्न हिंडनबर्ग रिसर्च एजन्सीने अदानी समूहाला विचारले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने