हॉस्पिटल मधून पंतला मिळणार डिस्चार्ज? लवकरच मैदानात...

मुंबई: तीन आठवड्यांपूर्वी कार अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत लवकरच मैदानात परतण्याची शक्यता आहे. ताज्या हेल्थ अपडेटनुसार दोन आठवड्यांच्या आत त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो, आणि त्यानंतर तो दोन महिने मैदानात येण्यासाठी तयारी सुरू करू शकतो. कार अपघातात ऋषभ पंतच्या गुडघ्याचे तीन महत्त्वाचे लिगामेंट तुटले होते. यापैकी दोनवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहेत, तर तिसऱ्या लिगामेंटच्या शस्त्रक्रियेबाबत सांगितले जात आहे की, 6 आठवड्यांनी होणार आहे. पण ऋषभला या तिसऱ्या लिगामेंटसाठी शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही. हे ताज्या अपडेटवरून उघड झाले आहे, असे झाल्यास त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकेल.TOI अहवालात बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, 'ऋषभच्या गुडघ्याचे लिगामेंट फाटले होते. डॉक्टर म्हणतात की मेडिअल कोलॅटरल लिगामेंटची शस्त्रक्रिया अत्यंत आवश्यक होती. आता पोस्टरियर क्रूसिएट लिगामेंटची स्थिती दोन आठवड्यांत पाहिली जाईल. यापुढे शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही अशी आशा आहे. अस्थिबंधन सहसा चार ते सहा आठवड्यांत स्वतःच बरे होतात. यानंतर पंत मैदानात येण्यासाठी तयारी सुरू करू शकतो.सूत्राने सांगितले की, ऋषभ पंतला दोन आठवड्यांत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. यानंतर बीसीसीआय त्याचा पुनर्वसन चार्ट तयार करेल. सूत्राने सांगितले की, 'तो किती दिवसात मैदानात परतू शकेल, याचा अंदाज 2 महिन्यांनंतर येईल. पंतला माहीत आहे की हा रस्ता सोपा नाही. अशा परिस्थितीत त्याला मैदानात परतण्यासाठी 4 ते 6 महिने लागू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने