सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शरद पवार अन् एकनाथ शिंदे एकाच मंचावर; पुण्यातील...

पुणे: राज्यातील सत्तांतर आणि नाट्यमय घडामोडीनंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर एकत्रित दिसणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.राज्यातील सत्तांतर आणि नाट्यमय घडामोडी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये दोन वेळा भेट झाली आहे. एमसीएच्या निवडणूकीच्या काळामध्ये आणि नंतर शरद पवार यांच्यावर शस्रक्रिया झाली त्यावेळी रुग्णालयात दोघांची भेट झाली होती. त्यामुळे या जाहीर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे दोन्ही नेते काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष्य लागून असणार आहे.दरम्यान याच कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील हे नेतेही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे पुण्यातील या कार्यक्रमाची चर्चा रंगू लागली आहे. मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने