"उत्तर प्रदेशचा विकास करायचा असेल तर..." ; संजय राऊतांचा योगींना खोचक टोला

 मुंबई : भाजप आणि शिवसेना खासदार संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ३६ चा आकडा निर्माण झाला आहे. भाजपवर टीका करण्याची संजय राऊत एकही संधी सोडत नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत येणार आहेत.टाटा, रिलायन्स, गोदरेज यासह सुमारे १० बड्या प्रतिष्ठानांची ते व्यक्तिश: भेट घेणार आहेत. तसेच बॉलिवूडमधील काही निर्मात्यांनाही ते भेटणार आहेत. उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हावी, असे लक्ष योगी आदित्यनाथ यांचे आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी योगींना खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचा विकास करायचा असेल तर त्यांनी गुजरातमध्ये देखील जावे, असे संजय राऊत म्हणाले, "राज्याच्या विकासात मुंबईचे योगदान असते. जर आपले राज्य उत्तर प्रदेशच्या विकासात योगदान देत असेल तर यात वाईट काय आहे. ही चांगली गोष्ट आहे. राज्यातील लोक, उद्योगपती कोणत्या देशासाठी, राज्यासाठी काही चांगले करत असतील, विकास करत असतील तर चांगले आहे. यापूर्वी योगी म्हणाले होते मुंबईच्या धरतीवर ते उत्तर प्रदेशात फ्लिम सिटी उभी करतील, आम्ही त्याचे देखील स्वागत केले."उत्तर प्रदेशच्या विकासाठी योगी आदित्यनाथ यांनी कंबर कसली आहे. योगी मंत्रिमंडळातील आठ मंत्री विदेशी दौरा करुन आले आहेत. आता देशांतर्गत गुंतवणूकदारांशीही हे मंत्री संपर्क साधत आहेत. योगी मुंबईत आले असताना त्यांचे सहकारी दिल्ली, चेन्नई, कोलकाता अशा महत्वाच्या शहरात भेटी देणार आहेत.

यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी दोन वर्षांपूर्वी डिसेंबर 2020 मध्ये मुंबईला भेट दिली होती. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात नवीन फिल्मसिटी बनवण्यासाठी अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूड कलाकारांचीही भेट घेतली होती. यावेळी तत्कालीन शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. तसेच योगींवर टीका केली होती.भाजपने सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता राज्याच भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचेच सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातले गेले तसे उत्तर प्रदेशात देखील जातील का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने