"संजय राऊतांनी आणखी २०-२५ वर्षे विरोधी पक्षात राहावं"

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जो़डो यात्रेमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत काल सहभागी झाले होते. त्यावरुनच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांना टोला लगावला आहे.रामदास आठवले उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी संजय राऊत आमच्या यात्रेत सहभागी होत नाही, ते भारत जोडो यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे त्यांनी आणखी २०-२५ वर्ष विरोधी पक्षातच राहावं, असा टोला आठवलेंनी लगावला आहे.खासदार संजय राऊत काल जम्मूमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींची गळाभेटही घेतली. या यात्रेदरम्यानचे फोटो संजय राऊतांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन शेअर केले आहेत. त्यावर माध्यमांनी रामदास आठवले यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.संजय राऊत - राहुल गांधी भेटीमध्ये काय झालं?

राहुल गांधींसोबतच्या भेटीमध्ये काय झालं याबद्दल संजय राऊतांनी सांगितलं आहे. राहुल गांधींनी आपल्याकडे उद्धव ठाकरेंची चौकशी केल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय डरो मत हा त्यांचा आणि माझा सामायिक मंत्र आहे. माझ्या घरातल्यांचीही चौकशी राहुल गांधींनी केल्याचं संजय राऊत म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने