"अरे तो ***"; CM शिंदेंबद्दल बोलताना राऊतांची जीभ घसरली

मुंबई:  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा, मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांची चौकशी, अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना पत्रकार मुख्यमंत्री शिंदेंबद्दल प्रश्न विचारू पाहत होते.







पण त्यांचा प्रश्न मध्येच तोडत राऊत म्हणाले, "अरे सोड रे *** आहे तो." यामुळे आता भाजपाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याविषयी ट्वीट केलं आहे. तसंच संजय राऊतांचा व्हिडीओही उपाध्ये यांनी शेअर केला आहे.आपल्या ट्वीटमध्ये केशव उपाध्ये म्हणतात, "महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचा अपमान आपण करत आहात. मतभेद असू शकतात पण ही भाषा? संजय राऊत महाराष्ट्राची माफी मागा."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने