निरुपयोगी उपग्रह अवकाश स्थानकाला धडकण्याची भीती

 पॅरिस : रशियाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला उल्का धडकल्याने त्याचा बचाव होणे अशक्य असल्याचे मानले जात आहे. मात्र अंतराळयानाला सर्वांत मोठा धोका म्हणजे अवकाशातील मानवनिर्मित कचरा असल्याचे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.लहान-लहान उल्का अवकाशयानावर आदळणे हे काही दुर्मिळ नाही, असे युरोपीय अवकाश संस्थेतील मानव आणि रोबोटिक संशोधन विभागाचे प्रमुख डिडियर शुमेट यांनी सांगितले. सूक्ष्म उल्का एका सेकंदाला १० ते ३० किलोमीटर वेगाने फिरू शकतात. बंदुकीतून झाडलेल्या गोळीपेक्षाही खूप वेगाने त्या फिरत असतात.म्हणूनच अवकाश स्थानकाची मोठी निरीक्षण खिडकी ही जेव्हा वापरात नसेल तेव्हा संरक्षक साधनाच्या अत्यंत जाड आवरणाने बंद केलेली असते. लहान उल्का दूरवरच्या विश्वातून आणि अत्यंत वेगाने येत असल्याने त्यांचा माग ठेवणे शक्य होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.परंतु अवकाश संशोधन संस्था ज्ञात उल्कावर्षावांचे निरीक्षण करतात. यंदा ऑगस्टच्या सुरुवातीला उल्कावर्षाव होणार आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात जेमिनिड उल्कावर्षावाची दिशा बदलल्याने सोयुझच्या कुपीला धडकण्याची शक्यता नसल्याचे ‘नासा’ आधी सांगितले होते.अंतराळवीरांना धोका

रशियाच्या अंतराळ स्थानकातील कुपीत गळती होऊ लागल्याने अंतराळवीरांना पृथ्वीवर येण्यास अडचण निर्माण झाली आहे. अवकाश स्थानकावर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर अंतराळवीरांना साधारणपणे तीन तासांत पृथ्वीवर परत आणले जाते.पण रशियाच्या अवकाशस्थानकातील सध्याची स्थिती नाजूक असून जर परिस्थिती आणखी बिघडली तर सर्व सात अंतराळवीरांना आणणे शक्य होणार नाही, अशी भीती डिडियर शुमेट यांनी व्यक्त केली. अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नवीन अंतराळयान २० फेब्रुवारी पाठविणार असल्याचे रशियाची अवकाश संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ने सांगितले आहे.

कचऱ्यात भर

  • शस्त्रास्त्रांच्या चाचण्यांसाठी क्षेपणास्त्रांद्वारे उपग्रह नष्ट करणाऱ्या देशांकडून अवकाशातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लक्षणीय भर

  • मॉस्कोने क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान स्वतःचा एक उपग्रह २०२१ नष्ट केला त्‍यावेळी त्याचे दीड हजारापेक्षा जास्त तुकडे झाले होते. यामुळे ‘आयएसएस’वरील अंतराळवीरांना सुरक्षित आश्रय घ्यावा लागल्याने ‘नासा’ने रशियावर टीका केली होती.

  • चीनने२००७ मध्ये त्याचा एक हवामान उपग्रह पाडला, त्यावेळी साडेतीन हजारपेक्षा जास्त तुकडे निर्माण झाले होते, असा ‘नासा’चा दावा

  • उपग्रह आणि अवकाशातील वस्तूंच्या अपघातातूनही कचरा वाढत असल्याचे दशकभरापासून दिसत आहे

  • रशियाच्या सैन्याचा एक निरुपयोगी उपग्रह २००९मध्ये ‘यूएस इरिडियम कम्युनिकेशन’ उपग्रहाला धडकला होता

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने