आंतरजातीय प्रेम करणाऱ्या जोडप्याचं प्राण वाचवण्यासाठी सावित्रीबाईंनी ही युक्ती वापरली

मुंबई: प्रेमाला कशाचेही बंधन नसतं. जात, धर्म वय या कचाट्यात प्रेम कधीही अडकत नाही. हे अनेक कवितांच्या माध्यमातून तूम्ही ऐकत आला आहात. हे काही आजच्या काळापुरतेच मर्यादित आहे, असे नाही. अनेक शतकांपासून आपल्याकडे आंतरजातिय विवाह होत आहेत. अगदी राजे महाराजेही राज्य वाढवण्यासाठी आंतरजातीय विवाहास प्राधान्य द्यायचे.राजे महाराजांच्या काळानंतर पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती होती. आंतरजातीय विवाह तुच्छ समजला जातो. आजही परिस्थिती काही वेगळी नाही. पण, 60 च्या दशकात असे काही करणाऱ्याला सुळावर दिले जात होते.देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी एका तरूणाचा जीव वाचवला होता. हा प्रसंग सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहीलेल्या पत्रात सांगितला होता. आज सावित्रीबाईंचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानेच या घटनेवर प्रकाश टाकूया. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेली काही पत्रे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या 'सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय' या पुस्तकात आहेत.



सावित्रीबाईंनी लिहिलेल्या या पत्राची तारीख ही 29 ऑगस्ट 1868 आहे. या पत्रात त्या म्हणतात की, आजच्या दिवशी एका गणेश नावाच्या ब्राह्मणाला मारहाण करण्यात आली. गणेश एक साधा गरीब तरूण जो गावोगावी फिरून पंचाग सांगून उदरनिर्वाह करतो. त्याला नुकत्याच वयात आलेल्या सारजा नावाच्या मुलीवर प्रेम झाले. त्यातून ती गरोदर राहिली. ती सध्या सहा महिन्याची गर्भवती आहे.आता ही गोष्ट समाजाच्या नजरेत आली. त्यामूळे काही विकृत लोकांनी त्या तरूणाला मारहाण केलीय.त्याची मिरवणूकही काढून त्याला कायमचे संपवण्यासाठी नेण्यात येत होता. ही गोष्ट मला समजताच, मी तिथे धावतपळत गेले आणि त्या गर्दीला इंग्रज सरकारचे भय दाखवून त्या तरूणाचे प्राण वाचवले. गावाने ठराव केला की, गणेश आणि सारजाने हे गाव सोडून जावे, त्यांनी गावात राहू नये.

सावित्रीबाईंनींना केवळ स्त्री शिक्षणाच्या चौकटीत बांधले जाते. पण,त्यांचे इतर समाजासाठी असलेले काम दुर्लक्षित केले जाते. पण, या पत्रातून हे उजेडात आले.समाजमान्य गोष्टी करताना सगळेच मदतील येतात. पण, समाजाच्या विरोधात काही गोष्टी करताना कोणीही मदतीला येत नाही. अशाच एकट्या पडलेल्या त्या जोडप्याच्या मागे सावित्रीबाई ठामपणे उभ्या होत्या. त्यांनी त्या काळातही समाजाचा विरोध पत्कारून पुढारलेले विचार हाती घेतले आणि समाजाला नवी दिशा दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने